नवी दिल्ली, 23 एप्रिल : मागील काही दिवसांपासून घरगुती गॅसच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. सबसिडी असणाऱ्या सिलेंडरची किंमत 2021 मध्ये आतापर्यंत 225 रुपये प्रति सिलेंडर वाढली आहे. दिल्लीत सबसिडी असणाऱ्या 14.2 किलोग्रॅम एलपीजी सिलेंडरची किंमत 819 रुपये इतकी आहे. परंतु पेटीएमने खास ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत 819 रुपयांचा सिलेंडर केवळ 19 रुपयांत घेता येऊ शकतो. म्हणजेच थेट 800 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. पेटीएमवरुन (Paytm) एलपीजी सिलेंडर (LPG cylinder) बुक करुन 800 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवता येऊ शकतो. देशातील अधिकांश भागात जिथे एलपीजी सिलेंडर सबसिडीनंतर 819 रुपये आहे, तेथे पेटीएमच्या खास कॅशबॅकचा फायदा घेत सिलेंडर 19 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो.
काय आहे प्रोसेस - - फोनमध्ये Paytm App नसेल, तर आधी ते डाउनलोड करावं लागेल. - त्यानंतर पेटीएममध्ये Show more वर क्लिक करावं लागेल. - आता ‘recharge and pay bills’ वर जा. - त्यानंतर ‘book a cylinder’ पर्यायावर क्लिक करा. - भारत गॅस, एचपी गॅस किंवा इंडेन यापैकी तुमचा गॅस प्रोव्हाईडर निवडा. - रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा LPG ID टाका. - त्यानंतर पेमेंट ऑप्शन दिसेल. - आता पेमेंट करण्यापूर्वी ऑफरवर ‘FIRSTLPG’ प्रोमो कोड टाका.
अटी आणि नियम - 800 रुपयांचा हा कॅशबॅक पेटीएम अॅपच्या माध्यातून पहिल्यांदा एलपीजी गॅस सिलेंडर बुक करणाऱ्या ग्राहकांनाच मिळू शकतो. कॅशबॅकची ही ऑफर 30 एप्रिल 2021 पर्यंतच आहे. बुकिंगच्या 24 तासांत ग्राहकाला कॅशबॅकचं स्क्रॅच कार्ड मिळेल. या स्क्रॅच कार्डचा 7 दिवसांच्या आता वापर करावा लागेल.