JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / फक्त तुम्हीच नाही तर Google ही करतेय तुमच्या अकाउंटची सुरक्षा, यासाठी फक्त करा एवढं काम

फक्त तुम्हीच नाही तर Google ही करतेय तुमच्या अकाउंटची सुरक्षा, यासाठी फक्त करा एवढं काम

केवळ तुम्हीच तुमच्या ऑनलाइन सुरक्षेचीच काळजी करत नाही तर गुगलही (Google) याबाबत काळजी घेत आहे.

जाहिरात

तुमच्या सुरक्षेसाठी Google ने टाकलं महत्त्वाचं पाऊल, आता करावं लागणार केवळ 'हे' काम

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली आहे. बँकिंग तसंच आर्थिक देवाण-घेवाणीची सर्व कामं आता ऑनलाईन झाली आहेत. कोरोनामध्ये तर डिजिटल व्यवहारास (digital transactions ) प्राधान्य दिलं जात आहे. मात्र या ऑनलाइन व्यवहारांमुळे आर्थिक फसवणुकीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. हजारो लोकांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे सरकार आणि बँकांकडून लोकांना ऑनलाईन फ्रॉडपासून (online fraud) अलर्ट राहण्याची सूचना केली जात आहे. या ऑनलाईन फ्रॉडपासून काळ काळजी घ्यावी हे पण वारंवार सांगितलं जात आहे. त्यामुळे प्रत्येकजण आता त्याबाबत काळजी घेत आहे. केवळ तुम्हीच तुमच्या ऑनलाइन सुरक्षेचीच काळजी करत नाही तर गुगलही (Google) याबाबत काळजी घेत आहे. गुगललाही वाटतं की आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य असावं. त्यामुळे गुगलने आपल्या ई-मेल अकाउंटचे टू स्टेप व्हेरिफिकेशन (2SV) आपल्या 150 दशलक्ष खातेदारांसाठी ऑटो एनेबल केलं आहे. गुगलच्या मते, सुरक्षेचा हा टप्पा तुमच्या ऑनलाईन सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. यामुळे इतर कोणीही आपल्या ई-मेल खात्यात प्रवेश करू शकत नाही. सणासुदीला Online शॉपिंग करत असाल तर सावधान राहा, ई-कॉमर्स वेबसाइट्सवरुन होतेय भारतीयांची फसवणूक टू स्टेप व्हेरिफिकेशन कसं करावं? टू स्टेप व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्ही तुमचं ई-मेल खातं पूर्णपणे सुरक्षित करू शकता. टू स्टेप व्हेरिफिकेशनसाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यात लॉग इन करण्यासाठी दोन टप्पे पार करावे लागतील. पहिल्या टप्प्यात तुम्ही तुमचा पासवर्ड एंटर करा आणि दुसऱ्यामध्ये तुम्हाला ओटीपी (OTP) टाकावा लागेल. जर तुम्ही ओटीपी टाकला नाही तर तुम्हाला तुमच्या खात्यात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ओटीपी मिळवण्यासाठी तुम्ही एसएमएस, व्हॉइस कॉल किंवा मोबाईल अॅप हे पर्याय वापरू शकता. म्हणजे ओटीपी तुम्हाला एसएमएस, व्हॉइस कॉल किंवा मोबाईल अपमध्ये पाठवला जाईल तो तुम्ही व्हेरिफिकेशनच्या दुसऱ्या टप्प्यात एंटर करायचा आहे. तुमचा बँक अकाउंट Password चोरी तर नाही ना झालाय? बचावासाठी लगेच करा हे काम टू स्टेप व्हेरिफिकेशन चालू करणं खूप सोपं आहे. इथं आम्ही आपल्याला सांगत आहोत की आपण आपल्या ई-मेल खात्यासाठी 2SV कसं लागू करू शकता. प्रथम तुम्हाला तुमचं गुगल ई-मेल खातं (Google Account) उघडावं लागेल. यानंतर नेव्हिगेशन पॅनेलमधील (Navigation Panel) सुरक्षा (Security) पर्याय निवडा. यामध्ये आपल्याला Signing in to Google वर जावं लागेल. त्यानंतर टू स्टेप व्हेरिफिकेशन (2-Step Verification) वर क्लिक करावं लागेल आणि नंतर Get start वर क्लिक केल्यानंतर तुम्ही टू स्टेप व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्हाला ऑन-स्क्रीन सूचनांचं पालन करावं लागेल. संपूर्ण प्रक्रियेचं पालन केल्यानंतर, आपल्या ई-मेल खात्याचं टू स्टेप व्हेरिफिकेशन केलं जाईल. गुगलने आपल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 2021 च्या अखेरीस आपल्या 150 दशलक्ष युजर्सचं टू स्टेप व्हेरिफिकेशन केलं जाईल. या व्यतिरिक्त 2 दशलक्ष यूट्यूब निर्मात्यांना देखील टू स्टेप व्हेरिफिकेशन चालू करावं लागेल. गुगलने म्हटलं की, कंपनीला आपले युजर्स सुरक्षित ठेवायचे आहेत. या पडताळणी प्रक्रियेद्वारे अकाऊंट वापरणारी व्यक्ती योग्य आहे आणि ती आपलंच अकाउंट वापरत असल्याचं गूगलला समजतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या