JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / सावधान! 1 लाख भारतीयांच्या Aadhaar, PAN आणि पासपोर्टचा इंटरनेटवर लागला सेल; वाचा संपूर्ण प्रकरण

सावधान! 1 लाख भारतीयांच्या Aadhaar, PAN आणि पासपोर्टचा इंटरनेटवर लागला सेल; वाचा संपूर्ण प्रकरण

डार्क नेटवरील माहितीवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की हा डेटा KYC मार्फत (Know your customer) लिक झाला आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 04 जून : एक लाखांहून अधिक भारतीयांचे आधार कार्ड (Aadhaar), पॅन (PAN Card) आणि पासपोर्टसह (Passport) इतर राष्ट्रीय ओळखपत्रांच्या स्कॅन कॉपीचा सेल डार्क नेटवर (Dark Net) लागला आहे. सायबर सिक्युरिटी फर्म सायबल (Cyble) यांनी ही माहिती दिली आहे. सायबलनं दिलेल्या वृत्तात, हा डेटा लीक थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवरून झाला आहे, सरकारी डेटाबेसमधून नाही. साधारणपणे तस्करी, दहशतवाद आणि इतर बेकायदेशीर कामांसाठी हे नेट वापरले जाते. कधीकधी याचा वापर संवेदनशील माहिती काढण्यासाठी देखील केला जातो. काय आहे संपूर्ण प्रकरण डार्क नेटवरील माहितीवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की हा डेटा KYC मार्फत (Know your customer) लिक झाला आहे, कारण डार्क वेबवर जो डेटा उपलब्ध आहे त्यात आधार कार्ड, पॅनकार्ड आणि पासपोर्टची स्कॅन कॉपी यांचा समावेश आहे. डार्क नेट म्हणजे इंटरनेटचा असा भाग जो सामान्य सर्ज इंजिनच्या आवाक्याबाहेर आहे. डार्क नेट वापरण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर आवश्यक आहे. वाचा- आता 10 नाही तर 11 अंकी असणार मोबाईल नंबर? लवकरच तुमच्या फोनमध्ये होणार मोठे बदल

कशी लीक झाली कागदपत्रं भारताच्या विविध भागांतील एक लाखाहून अधिक लोकांचा डेटा येथे उपलब्ध असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका अज्ञात युझरनं सुमारे एक लाख ओळख कागदपत्रं मिळवून ही कागदपत्रं भारतीयांची असल्याची माहिती दिली आहे. ही सर्व कागदपत्रं स्कॅन कॉपी फॉर्ममध्ये आहेत. ही कागदपत्रं KYCच्या डेटाबेसमधून चोरीला गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वाचा- कस्टमर केअर अधिकारी बनून लंपास केले 9 लाख, SIM द्वारे तुमचीही होऊ शकते फसवणूक

वाचा- WhatsApp वर एकाचवेळी करता येईल 50 जणांना Video Call, वाचा काय आहे नवीन फीचर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या