JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / तुम्ही या फेक Paytm App चा वापर करत नाही ना? मोठ्या फसवणुकीची शक्यता

तुम्ही या फेक Paytm App चा वापर करत नाही ना? मोठ्या फसवणुकीची शक्यता

Paytm ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला एका फेक Paytm App ची माहिती मिळाली आहे. यामुळे चुकीच्या पेमेंट कन्फर्मेशन पेजवर पोहोचवलं जातं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 7 जानेवारी : मागील वर्षापासून डिजीटल व्यवहार, ऑनलाइन पेमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली आहे. Google Pay, Paytm, phonePe असे अनेक Apps ऑनलाइन पेमेंटसाठी वापरले जातात. एकीकडे डिजीटल पेमेंटमध्ये वाढ होत असताना, दुसरीकडे मात्र ऑनलाइन फ्रॉडच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे युजर्ससह, दुकानदारांनीही सतर्क राहणं गरजेचं आहे. नुकतंच फेक Paytm बाबत माहिती समोर आली असून Paytm कडून युजर्सला अलर्ट करण्यात आलं आहे. Paytm ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला एका फेक Paytm App ची माहिती मिळाली आहे. यामुळे चुकीच्या पेमेंट कन्फर्मेशन पेजवर पोहोचवलं जातं. सोशल मीडियावर Paytm Spoof हे अगदी खऱ्या Paytm प्रमाणे दिसणारं App असून यामुळे चुकीच्या पेमेंट कन्फर्मेशन पेजवर पोहोचवलं जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या Paytm चे जवळपास 23 मिलियन मर्चेंट असून फेक Paytm द्वारे दुकानदारांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे दुकानदारांनी ज्यावेळी कोणी ग्राहक दुकानदारांकडे पेमेंट करतो, त्यावेळी ते पेमेंट रिसिप्ट वेरिफाय करेल असंच Paytm वापरावं असा सल्ला दिला आहे. Paytm वरुन ज्यावेळी कोणी ग्राहक ट्रान्झेक्शन करतो, त्यावेळी पेमेंट रिसिप्ट कन्फर्म करण्याच्या पद्धती असतात. - SMS नोटिफिकेशन - Paytm For Business App द्वारे नोटिफिकेशन - Paytm साउंड बॉक्स

लग्नानंतर Aadhaar Card मध्ये तुमचं आडनाव कसं बदलाल? पाहा सोपी प्रोसेस

Paytm च्या फेक App द्वारे एखाद्या दुकानातून काही सामान खरेदी केल्यास दुकानदाराला सामानाची किंमत, दुकान किंवा दुकानदाराच्या नावाने फेक रिसिप्ट दाखवून लूट केली जात आहे. हे फेक App दुकानदारांना पैसे रिसिव्ह झाल्याचं नोटिफिकेशनही दाखवतं, पण बँकमध्ये मात्र पैसे क्रेडिट होत नाहीत.

Car Driving शिकायचं आहे?Maruti Suzukiने सुरू केले हे खास कोर्स, पाहा किती आहे फी

कसा होईल बचाव? दुकानदारांनी Paytm किंवा इतर कोणत्याही App द्वारे मिळणारं पेमेंट ट्रॅक करण्यासाठी सतत अकाउंट चेक करावं. तसंच Paytm द्वारा पेमेंट नोटिफिकेशन डिव्हाइस लावणं गरजेचं आहे, जे ट्रान्झेक्शन झाल्यानंतर दुकानदाराला बोलून पेमेंट रिसिव्ह झाल्याची माहिती देईल. यामुळे फेक App द्वारे रिसिप्ट क्रिएट केली जाणार नाही. तसंच कोणतंही पेमेंट करताना, QR code स्कॅन करताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या