नवी दिल्ली, 9 मार्च : नवा iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. iPhone 13 स्वस्तात घरी आणू शकता. या फोनसाठी चांगली ऑफर असून Aptronix Store Apple च्या या स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट-ऑफर देत आहे. सध्या iPhone 13 च्या 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 79900 रुपये आहे, परंतु तुम्ही हा फोन 35990 रुपयांपर्यंत घरी आणू शकता. Aptronix भारतातील सर्वात मोठं रिटेल स्टोर आणि रिसेलर्सपैकी एक आहे. स्टोर केवळ Apple iPhone 13 वर डिस्काउंट ऑफर करत नाही, तर MacBook देखील कमी किमतीत खरेदीची संधी आहे. Aptronix शिवाय Apple चे डिव्हाइस विजय सेल्स **(Vijay Sales)**आणि अॅमेझॉनवरही (Amazon) डिस्काउंटमध्ये मिळत आहेत.
iPhone 13 ऑफर - iPhone 13 हा 35990 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. याच्या 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 79,990 रुपये आहे. पण Aptronix या फोनवर 11,900 रुपयांचा स्पेशल डिस्काउंट देत आहे. त्याशिवाय 6000 रुपयांचा कॅशबॅकही मिळतो आहे. परंतु कॅशबॅक काही निवडक बँक कार्ड्सवरच आहे. SBI, ICICI, Kotak बँक कार्ड्सवर 6000 रुपयांचा कॅशबॅक मिळतोय. कॅशबॅक फोन खरेदी केल्यानंतर 90 दिवसांमध्ये क्रेडिट होईल. त्याशिवाय Aptronix जुन्या iPhone वर 23,100 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. तसंच 3000 रुपये एक्सचेंज बोनस मिळतो आहे. अशाप्रकारे iPhone 13 च्या 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 35990 रुपये होते. महत्त्वाची बाब म्हणजे एक्सचेंज ऑफरमध्ये फोनच्या कंडिशनवर फोनची किंमत ठरते. जर तुमच्याकडे iPhone 11 आणि iPhone 12 असेल तर तुम्ही 23000 रुपयांची एक्सचेंज व्हॅल्यू मिळवू शकता. ही ऑफर केवळ दिल्ली एनसीआरसाठी आहे.
iPhone 13 फीचर्स - Apple iPhone 13 मध्ये 6.1 इंची Super Retina XDR OLED स्क्रिन मिळते. यात A15 Bionic चिपसेट मिळते. हा फोन तीन वेरिएंटमध्ये येतो. 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज ऑप्शनमध्ये फोन मिळतो. फोन iOS 15 वर काम करतो. फोनला डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. प्रायमरी लेन्स 12 मेगापिक्सल, सेकंडरी लेन्स 12 मेगापिक्सल आहे. फ्रंटला सेल्फीसाठी 12 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. यात 20W फास्ट चार्जिंग मिळतं.