नवी दिल्ली, 21 जानेवारी : भारतात डिजिटल पेमेंट आणि डिजिटल ट्रान्झेक्शनचा वाढता ट्रेंड पाहता टेलिकॉम कंपनी एअरटेलनेही (Airtel) ऑनलाईन पेमेंटमध्ये पाऊल ठेवलं आहे. एअरटेलने ‘Airtel Safe Pay’ नावाने एक सर्व्हिस सुरू केली आहे. ही सर्व्हिस एअरटेलच्या ऑनलाईन बँकिंग सिस्टम, एअरटेल पेमेंट बँक (Airtel Payments Bank) अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. याद्वारे युजर्स सुरक्षित आणि सहज ऑनलाईन ट्रान्झेक्शन करू शकतील असा दावा कंपनीने केला आहे. व्हॉ्टसअॅप आणि अॅमेझॉनने यापूर्वीच ही सर्व्हिस सुरू केली आहे. एअरटेलने दिलेल्या माहितीनुसार, Airtel Safe Pay मध्ये सुरक्षिततेकडे खास लक्ष देण्यात आलं आहे. युजर्स सहजपणे, कोणत्याही भितीशिवाय डिजिटल ट्रान्झेक्शन करू शकतात. Airtel ने एका प्रेस रिलीजच्या माध्यमातून सांगितलं की, एअरटेल युजर्सला फिशिंगपासून वाचवण्यासाठी या सर्व्हिसची सुरुवात करण्यात आली आहे. हे अधिक सुरक्षित आहे. युजर्स या सर्व्हिसद्वारे आपल्या मित्र, नातेवाईकांना सहजपणे पैसे पाठवू शकतात. या ऑनलाईन पेमेंट सर्व्हिसद्वारे युजर्स कोणत्याही फसवणुकीशिवाय ट्रान्झेक्शन करू शकतील. ही अतिशय सुरक्षित पेमेंट सर्व्हिस असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
कसं वापरला Airtel Safe Pay - - Airtel Safe Pay ला Airtel Payments Bank मध्ये जाऊन सुरू करू शकता. - त्यासाठी एअरटेल युजर्सला, आपल्या मोबाईलवर Airtel Thanks App सुरू करावं लागेल. - त्यानंतर स्क्रिनवर Payments Bank पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. - युजरकडून अॅड केलेलं अकाउंट सेफ पे स्टेट डिएक्टिवेटेड दिसेल.
- अकाउंटवर क्लिक केल्यानंतर Enable Safe Pay चा पर्याय दिसेल. - ते Enable केल्यानंतर, नेट बँकिंग आणि UPI पेमेंट्स करता येतील. - ज्यावेळी ट्रान्झेक्शन कराल, त्यावेळी अलर्ट मेसेज येईल आणि तुमच्या सहमतीनंतरच ऑनलाईन व्यवहार होऊ शकेल.