नवी दिल्ली, 4 मार्च : एयरटेलने (Airtel) आपल्या युजर्ससाठी एक नवी सुविधा आणली आहे. कंपनीच्या या सुविधेअंतर्गत युजर्सला त्यांचं जीवन अधिक सोयीचं-सुरक्षित करण्यास मदत होऊ शकते. एयरटेलने एयरटेल एक्ससेफ (Airtel Xsafe) ही सेवा सुरू केली आहे. या अंतर्गत एयरटेल युजर्सला (Airtel Users) 99 रुपये प्रति महिना किंवा 999 रुपये प्रति वर्ष अशा एका निश्चित किमतीत सुरक्षा कॅमेरा देणार आहे. हे एक प्रकारचे स्मार्ट सिक्योरिटी कॅमेरा (Smart Security Camera) आहेत. युजर आपल्या घर किंवा ऑफिससाठी असे कॅमेरे घेऊ शकतात. Airtel Xsafe मध्ये तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. जाणून घ्या कसं काम करतो हा Airtel Xsafe कॅमेरा, काय आहेत फीचर्स. Airtel Xsafe ही Airtel ची एक स्मार्ट सुविधा आहे. यात पर्सन डिटेक्शन, फुल एचडी व्हिडीओ, टू-वे टॉक, क्लाउड स्टोरेज, लाइव्ह रेकॉर्ड, लाइफटाइम कॉल आणि फील्ड सपोर्ट, व्हिडीओ डाउनलोड आणि शेअर, मोशन सेंसिटिव्हिटी कंट्रोल, इनबिल्ट डिव्हाइस अलार्म असे फीचर्स आहेत.
Airtel Xsafe अंतर्गत तीन कॅमेरे दिले जातात. स्टिकी कॅम, 360 डिग्री आणि एक अॅक्टिव्ह डिफेन्स कॅमेरा देण्यात आला आहे. स्टिकी कॅम 2499 रुपयात येतो. हा कॅमेरा सर्वात स्वस्तात आहे. 360 डिग्री कॅमेरा 2999 रुपये आणि अॅक्टिव्ह डिफेन्स कॅमेरा 4499 रुपयांत येतो. Airtel Xsafe ही सुविधा घेण्यासाठी हे कॅमेरे खरेदी करून तुम्हाला महिन्याला किंवा वर्षाला पेमेंट करावं लागेल.
एयरटेलची एक फायबर ब्राडबँड सेवाही आहे. त्याला एयरटेल एक्सस्ट्रीम फायबर (Airtel Xstream Fiber) असं म्हटलं जातं. ही Airtel Xstream Fiber सेवा घेतल्यास कॅमेरा सतत सुरू राहिल. या सेवेच्या माध्यमातून युजरकडे त्यांचे कॅमेरे कुशलतापूर्वक काम करण्यासाठी एक चांगलं इंटरनेट कनेक्शन असणं गरजेचं आहे. ही सेवा सध्या तुमच्या क्षेत्रात उपलब्ध नसली, तरी एयरटेल ही सुविधा देशातील प्रत्येक शहरांत आणण्यासाठी काम करत आहे. ही सेवा तुमच्या भागात आहे की नाही हे तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर तपासू शकता. तसंच या अनोख्या सुविधेबाबतची इतर माहितीही वेबसाइटवर घेऊ शकता.