नवी दिल्ली, 29 मे : कोरोनाचा (corona) संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन (lockdown) लावण्यात आलंय, त्यामुळे लोक घरीच आहेत. बरेच जण वर्क फ्रॉम होम (work from home) करत असल्यानं घरी आहेत. ऑफिसचं काम करण्यासाठी परवडणारा रिचार्ज प्लॅन (recharge plan) असणं महत्वाचं आहे. तसंच वेब सिरीज आणि ऑनलाइन गेम्ससाठीही इंटरनेट लागतं. त्यामुळे तुम्ही चांगली ऑफर देणारा आणि परवडणारा रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. टेलिकॉम कंपन्यांचे असे काही प्लॅन्स आहेत, ज्यात रिचार्ज केल्यास तुम्हाला डबल व्हॅलिडीटी, म्हणजेच buy 1 get 1 free मिळेल. Reliance Jio - जिओ त्यांच्या ग्राहकांना 6 डबल बेनिफिट्स रिचार्ज प्लॅनची ऑफर देतंय. म्हणजेच हा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला डबल फायदा होईल. जिओच्या 39 रुपये, 69 रुपये, 75 रुपये, 125 रुपये, 155 रुपये आणि 185 रुपयांच्या प्लॅनवर तुम्हाला डबल व्हॅलिडीटी मिळेल. 39 आणि 69 रुपयांच्या रिचार्जवर आधी 14 दिवसांची व्हॅलिडीटी होती, ती आता 28 दिवस करण्यात आली आहे. तसंच 39 रुपयांत आधी 100 MB डेटा मिळायचा तो आता 200MB वाढवला असून, 69 रुपयांत मिळणारा 0.5 GB डेली डेटा 1GB पर्यंत वाढवला आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये तुम्हाला फ्री कॉलिंग आणि जिओ अॅप्सचं सब्सक्रिप्शन देखील मिळतं.
Airtel - Airtel ने आपल्या ग्राहकांसाठी डबल बेनिफिट्स असणारे दोन रिचार्ज प्लॅन आणले आहेत. जे 79 आणि 128 रुपयांचे आहेत. 128 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 200MB डेटा आणि 128 रुपयांचा टॉक टाइम मिळेल. या प्लॅनची वैधता 28 दिवस राहील. कोरोना काळात कंपनी त्यांच्या लो-इनकम ग्रुप प्रीपेड युजर्सना 49 रुपयांचा फ्री रिचार्ज देत आहे. त्यामध्ये ग्राहकांना 100MB डेटा आणि 38 रुपयांचा टॉक टाइम दिला जातोय. 49 रुपयांच्या या फ्री रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे.
Vodafone-Idea - एयरटेल प्रमाणेच वोडाफोनही त्यांच्या लो-इनकम ग्रुप युजर्सना 49 रुपयांचा फ्री रिचार्ज देत आहे. कंपनीकडून डबल बेनिफिट्स प्लॅन अंतर्गत या 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100MB डेटा आणि 38 रुपयांच्या टॉक टाइमसह 28 दिवसांची व्हॅलिडीटी दिली जात आहे. याशिवाय कंपनीच्या 79 रुपयांच्या प्लॅनमध्ये डबल बेनिफिट (double benefit ) अंतर्गत 128 रुपयांचा टॉकटाइम (talk time) आणि 200MB डेटासह 28 दिवसांची व्हॅलिडीटी दिली जात आहे.