JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / फेक न्यूज पसरवणं थांबवा, अन्यथा...; अरिजितच्या गाण्यातून पोलिसांनी दिला खास संदेश

फेक न्यूज पसरवणं थांबवा, अन्यथा...; अरिजितच्या गाण्यातून पोलिसांनी दिला खास संदेश

पोलिसांच्या (Assam Police) सोशल मीडिया टीमने सोशल मीडियावर बेजबाबदारपणे अफवा (Misinformation) आणि खोट्या बातम्या (Fake News) पसरावणाऱ्यांसाठी खास एका गाण्याचा वापर केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आसाम, 26 फेब्रुवारी : अरिजित सिंह (Arijit Singh) हा गोड आवाजाचा गायक सध्या तरूणाईच्या गळ्यातील ताईत आहे. त्याची जवळपास सगळीच गाणी हिट आहेत. त्याच्या गाण्यांचा उपयोग फेक न्यूज पसरवणाऱ्या लोकांना इशारा देण्यासाठी केला जाईल, असा मात्र कोणी विचारही केला नसेल. आसाम पोलीसांनी मात्र अरिजित सिंहच्या गाण्याचा वापर समाजप्रबोधनासाठी करत लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आसाम पोलिसांच्या (Assam Police) सोशल मीडिया टीमने सोशल मीडियावर बेजबाबदारपणे अफवा (Misinformation) आणि खोट्या बातम्या (Fake News) पसरावणाऱ्यांसाठी खास एका गाण्याचा वापर केला आहे. आसाम पोलिसांच्या सोशल मीडिया टीमने या गाण्याचा एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 2014 मध्ये आलेल्या हेट स्टोरी-2 (Hate Story-2) या सिनेमातील ‘आज फिर’ या गाण्याच्या एका ओळीचा वापर करत, जेव्हा एखादी व्यक्ती फेक न्यूज आणि अफवा पसरवत असते तेव्हा, त्यासाठी ‘ना फिकर, ना शरम ना लिहाज आया’ ही ओळ अगदी समर्पक ठरत असल्याचं पोलीसांनी म्हटलं आहे. त्यांची ही पोस्ट झपाट्याने व्हायरल होत असून ट्वीटरवर आतापर्यंत 4.6 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. याचबरोबर मर्डर-2 (Murder -2) या सिनेमातील ‘फिर मोहब्बत करने चला है तू’ या गाण्याचा वापर करत ‘फिर मिसइनफॉर्मेशन शेअर करने चला है तू’ असा संदेशही पोलिसांनी दिला आहे.

(वाचा -  अमिषा पटेलनं केला कोट्यवधींचा Fraud? व्यावसायिकानं खेचलं कोर्टात )

फेसबुकवरदेखील (Facebook) ही पोस्ट व्हायरल झाली आहेत. अशी अफलातून कल्पना ज्याला सुचली असेल त्या पोलिसाला पुरस्कार द्यायला हवा, असं एकाने म्हटलं आहे. आसाम पोलिसांचे सोशल मीडिया हँडल सांभाळणाऱ्या व्यक्तीचंही एका युजरनं कौतुक केलं आहे. अनेकांनी या अनोख्या कल्पनेचं कौतुक केलं आहे.

(वाचा -  या सेलिब्रिटीचे 2 Dogs चोरीला; जो शोधेल त्याला मिळणार तब्बल 3 कोटी )

याआधीदेखील आसाममधील दिब्रुगड जिल्ह्यातील पोलिसांनी (Dibrugarh District Police) नेटफ्लिक्सच्या (Netflix) नार्कोस (Narcos) या मालिकेतील एका डायलॉगचा वापर करत गुन्हेगारांना इशारा दिला होता. जिल्ह्यामध्ये ड्रग्स स्मगलिंग करणाऱ्या चार व्यक्तींना अटक करत त्यांच्याकडून 85 ग्रॅम ड्रग्स पोलिसांनी जप्त केलं होतं. त्यावर त्यांनी या कार्यक्रमातील एक डायलॉग वापरत ‘Drugs Peddling will Pablo-bly end you up behind the Esco-bars!’ असं कॅप्शन देत फोटो पोस्ट केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या