JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Aadhaar कार्ड सोबत ठेवण्याचं टेन्शन नाही, फोनमध्ये डाउनलोड करा mAadhaar; जाणून घ्या कसा कराल याचा वापर

Aadhaar कार्ड सोबत ठेवण्याचं टेन्शन नाही, फोनमध्ये डाउनलोड करा mAadhaar; जाणून घ्या कसा कराल याचा वापर

mAadhaar मुळे प्रत्येक वेळी फिजिकल आधार कॉपी बाळण्याची गरज पडणार नाही. mAadhaar डाउनलोड करुन सॉफ्ट कॉपी ठेवता येते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : यूनिट आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया अर्थात UIDAI ने आधार सर्विससंबंधित मोबाईल अ‍ॅप mAadhaar लाँच केलं. हे अ‍ॅप अँड्रॉईड आणि iOS युजर्स दोघांसाठी उपलब्ध आहे. mAadhaar अ‍ॅपद्वारे युजर फोनवरच सर्व आधार डिटेल्स अ‍ॅक्सेस करू शकतात. mAadhaar मुळे प्रत्येक वेळी फिजिकल आधार कॉपी बाळण्याची गरज पडणार नाही. mAadhaar डाउनलोड करुन सॉफ्ट कॉपी ठेवता येते. एकदा फोनमध्ये mAadhaar app डाउनलोड केल्यानंतर, आधार प्रोफाईल अ‍ॅपवर स्टोर होईल. यात रजिस्टर्ड नंबर, नाम, अ‍ॅड्रेस, लिंग, फोटो आणि इतर डिटेल्स सामिल असतील. - mAadhaar Google Play Store आणि Apple App Store वरुन डाउनलोड करता येईल. - mAadhaar UIDAI अ‍ॅप निवडा आणि इन्स्टॉल करा. - mAadhaar ओपन केल्यानंतर एक फॉर्म दिसेल. त्यात पासवर्ड तयार करावा लागेल. mAadhaar शी आधार नंबर कसा लिंक कराल - - सर्वात आधी आधार कार्ड स्कॅन करावं लागेल किंवा 12 अंकी आधार नंबर टाकावा लागेल. - इथे जो मोबाईल नंबर द्याल, तो UIDAI शी लिंक नंबरच असावा. - संपूर्ण डिटेल्स भरल्यानंतर वेरिफायवर क्लिक करा. त्यानंतर OTP येईल. प्रोसेस पूर्ण करण्यासाठी OTP टाईप करा.

UIDAI Alert! Online चुकूनही शेअर करू नका तुमचे Aadhaar डिटेल्स

mAadhaar डिलीट कसं कराल - - mAadhaar ओपन करा. - प्रोफाईलवर वरच्या बाजूला असलेल्या ड्रॉप-डाउन मेन्यूवर क्लिक करा. - आता डिलीट प्रोफाईल पर्याय निवडा. - ऑथेंटिकेशनसाठी पासवर्ड टाका. यानंतर प्रोफाईल डिलीट केलं जाईल.

तुमच्या मुलांचं Aadhaar अपडेट आहे का? हे दोन बदल करणं आवश्यक, अन्यथा होईल इनअ‍ॅक्टिव्ह

mAadhaar ची वैशिष्ट्यं - - एनरोलमेंट सेंटरचं लोकेशन पाहाता येतं. - SMS द्वारे आधार सर्विस घेता येते. - एक युजर एका फोनवर अधिकतर 5 प्रोफाईल अ‍ॅक्सेस करू शकतो. - बायोमेट्रिक्स लॉक-अनलॉक करता येतील. - आधार लॉकिंग करता येईल. - प्रोफाईल अपडेट करता येईल. - रिक्वेस्ट स्टेटस चेक करता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या