JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / 5Gच्या वेगासोबत धोकेही वाढणार! हायस्पीड इंटरनेट युजर्सनी या गोष्टीपासून सावध राहा

5Gच्या वेगासोबत धोकेही वाढणार! हायस्पीड इंटरनेट युजर्सनी या गोष्टीपासून सावध राहा

5G वायरलेस कम्युनिकेशनचा वेग आणि प्रतिसाद वाढवेल. मात्र, याच्या फायद्यासोबत तोटेही आहेत.

जाहिरात

5Gच्या वेगासोबत धोकेही वाढणार!

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 ऑक्टोबर : आजपासून भारतात 5G चे युग सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 1 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील प्रगती मैदानावर इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये 5G सेवेचा शुभारंभ केला. पहिल्या टप्प्यात अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे या 13 शहरांमध्ये 5G कनेक्टिव्हिटी सुरू केली जाईल. रिलायन्स जिओने यावर्षी दिवाळीपर्यंत देशातील सर्व मेट्रो शहरांमध्ये 5G लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. 5G सेवेने इंटरनेटचं स्पीड प्रचंड वेगाने वाढणार आहे. मात्र, या वेगासोबत युजर्सचे धोकेही वाढणार आहेत. 5G तंत्रज्ञान आरोग्य, शिक्षण, बँकिंग क्षेत्र, वाहतूक, वीज, अवकाश अशा सर्वच क्षेत्रात मोठा बदल घडवून आणेल. यामुळे जीवन खूप सोपे होईल. एकीकडे त्याचे सकारात्मक पैलू अमर्यादित आहेत, तर दुसरीकडे हॅकिंग किंवा डेटा चोरीसारख्या नकारात्मक गोष्टीही असतील. 5G वायरलेस कम्युनिकेशनचा वेग आणि प्रतिसाद वाढवेल. त्याचे अनेक फायदे होतील. मात्र, नवीन गोष्टी नवीन जोखीम देखील घेऊन येतात. हे 5G तंत्रज्ञानावर देखील लागू होते. हे आहे धोके आजच्या काळात प्रत्येक उपकरणाने छोट्या संगणकाचे रूप धारण केले आहे. भारतातील विद्यमान इंटरनेट पायाभूत सुविधांमध्ये अनेक छिद्रे आहेत ज्यामुळे डेटा प्रोटेक्‍शन उपाय कमकुवत होत आहेत. 5G सोबत अत्याधुनिक बॉटनेट, गोपनीयता भंग आणि जलद डेटा विश्लेषणाचा धोका वाढू शकतो. 5G सुरू झाल्यामुळे, स्मार्ट होम डिव्हाइसेस, कार इन्फोटेनमेंट सिस्टम, स्मार्ट टीव्ही यासह असंख्य उपकरणे इंटरनेटशी कनेक्ट होतील. हे डेटा सुरक्षिततेसाठी कमकुवत कडी असल्याचे सिद्ध होऊ शकतात. वाचा - 5G सेवेमुळे आयुष्य 360 डिग्री बदलणार, तुम्हाला कसा होणार फायदा पाहा 5G ची मोठी बँडविड्थ गुन्हेगारांना सहजपणे डेटाबेस चोरण्यास मदत करेल. कालांतराने आणखी उपकरणे जोडली जातील आणि त्यामुळे सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढेल. एवढेच नाही तर 5G आल्यानंतर होणारे सायबर हल्ले आणखी अचूक असू शकतात. सरकारची तैयारी तज्ञांचे म्हणणे आहे की डेटा सुरक्षा आणि सायबर हल्ले रोखण्यासाठी सरकारला एक इकोसिस्टम तयार करावी लागेल. मात्र, 5G सेवा वापरणाऱ्या वापरकर्त्यांना देखील अधिक सतर्क राहावे लागेल. सरकार डेटा सुरक्षेबाबत खूप गंभीर आहे. सरकार लवकरच डेटा प्रोटेक्‍शन आणू शकते. मोबाईल सिमचा गैरवापर रोखण्यासाठी सरकारने सिमचा IMEI नंबर नोंदवणे अनिवार्य केले आहे. येत्या दीड वर्षात डिजिटल इंडिया प्रणाली तयार करण्याचा सरकारचा मानस असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अधिक सतर्क असणे आवश्यक सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्सचे असेही म्हणणे आहे की, 5G आल्यानंतर त्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी यूजर्सनाही अधिक सावध राहावे लागेल. वेगवान इंटरनेट स्पीडमुळे सायबर गुन्हेगारांना सायबर हल्ले अधिक वेगाने करण्यास मदत होईल. त्यामुळे इंटरनेट वापरताना थोडा निष्काळजीपणाही वापरकर्त्यांना महागात पडू शकतो. वापरकर्त्यांना त्यांच्या प्राधान्य यादीत सायबर सुरक्षा ठेवावी लागेल. पासवर्ड, ओटीपी, वैयक्तिक, आर्थिक आणि बँकिंग डेटा शेअर न करण्याची आणि पडताळणीशिवाय कुठूनही काहीही डाउनलोड न करण्याची सवय लावावी लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या