JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / 50 MP कॅमेरासह Vivo चा जबरदस्त मिड-रेंज स्मार्टफोन लाँच, कॅशबॅक ऑफरसह स्वस्तात खरेदीची संधी

50 MP कॅमेरासह Vivo चा जबरदस्त मिड-रेंज स्मार्टफोन लाँच, कॅशबॅक ऑफरसह स्वस्तात खरेदीची संधी

लाँच ऑफरअंतर्गत कंपनी या फोनवर 1500 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. कॅशबॅकसाठी युजर्स HDFC आणि ICICI बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे खरेदी करता येईल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोने (Vivo) नवा स्मार्टफोन Vivo Y33s लाँच केला आहे. कंपनीने हा नवा स्मार्टफोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये आणला आहे. हा फोन सिंगल वेरिएंट 8 GB रॅम आणि 128 इंटरनल स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनची किंमत 17,990 रुपये इतकी आहे. हा फोन सेलसाठी विवो इंडियाच्या ई-स्टोर आणि फ्लिपकार्ट, पेटीएम आणि इतर प्रमुख रिटेल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. लाँच ऑफरअंतर्गत कंपनी या फोनवर 1500 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. कॅशबॅकसाठी युजर्स HDFC आणि ICICI बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे खरेदी करता येईल. Vivo Y33s स्पेसिफिकेशन्स (Vivo Y33s Specificatins) - - 6.58 इंची फुल एचडी+ डिस्प्ले - मीडियाटेक हीलियो G80 SoC चिपसेट प्रोसेसर - 5000mAh बॅटरी - साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक फीचर - अँड्रॉईड 11 बेस्ड Funtouch OS 11.1

Alert! फोनमधून डिलीट करा हे 8 Apps, Googleकडूनही बॅन; 4500 युजर्सला आर्थिक फटका

कॅमेरा - फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, 2 मेगापिक्सल मॅक्रो शूटर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

या फोनची स्क्रिन तुटली तर भरावे लागतील 36000 रुपये,या फोनमध्ये इतकं आहे तरी काय?

फोनला 8 जीबी रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कंपनी 1 टीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट करणाऱ्या फोनमध्ये 4 GB एक्सटेंडेट रॅमदेखील ऑफर करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या