नवी दिल्ली, 25 मे : इन्स्टाग्राम (Instagram) एका नव्या सिक्योरिटी फीचरवर काम करत आहे. नव्या सिक्योरिटी फीचरमुळे Instagram युजर्सला टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन कोड (2FA) WhatsApp Messenger किंवा WhatsApp Business वर मिळेल. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन एक लॉगइन सिक्योरिटी सिस्टम आहे. यामुळे लॉगइन करण्यापूर्वी दोन लेयर सिक्योरिटीची गरज असते. अॅप अॅनालिस्ट Alessandro Paluzzi ने दिलेल्या माहितीनुसार, 2FA फीचर ऑप्शनल असेल, याचा वापर असे युजर्स करू शकतात, ज्यांना त्यांचं अकाउंट सुरक्षित नसल्याचं वाटतं. Instagram ने हे फीचर अद्याप ऑफिशियल केलेलं नाही. परंतु, अॅप अॅनालिस्ट Alessandro Paluzzi ने इन्स्टाग्राम यावर काम करत असल्याची माहिती दिली आहे.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन एनेबल केल्यानंतर इन्स्टाग्राम युजरकडे त्यांच्या फोन नंबरची मागणी करेल. त्याचवेळी एक नोटही येईल, ज्यात WhatsApp अकाउंट कन्फर्म करण्याआधी फोन नंबर अॅड करण्याचं सांगितलं जाईल.
याबाबत त्यांनी काही स्क्रिनशॉटही ट्विटरवर शेअर केले आहेत. यात नव्या फीचरचं इंटरफेस दाखवण्यात आलं आहे. स्क्रिनशॉटनुसार, हे फीचर इन्स्टाग्राम iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी आणणार असल्याची शक्यता आहे. हे फीचर लाँच झाल्यानंतर युजर्स या फीचरचा वापर करू शकतील.