नवी दिल्ली, 22 मार्च : ट्रॅफिक नियमांचं पालन न करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. वाहन चालवताना नियमांचं पालन न करणं आता चांगलंच महाग पडू शकतं. ट्रॅफिक नियम मोडल्यास एक वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. एवढंच नाही तर, त्यासोबत 10000 रुपये दंडही भरावा लागू शकतो. यासंदर्भात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नियम न मोडण्याचा इशारा दिला आहे. याबाबत माहिती देताना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सांगितलं की, सार्वजनिक ठिकाणी रेसिंग आणि वेगात वाहन चालवताना आढल्यास, या नियमाचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली 5000 रुपये दंड आणि 3 महिन्यांच्या तुरुंवासाची शिक्षा होऊ शकते. एकदा नियमांचं उल्लंघन केल्यानंतर पुन्हा अशाप्रकारे नियम मोडल्याचं आढल्यास 10000 रुपये आणि एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
या व्यतिरिक्त, मोटार वाहन कायद्याच्या कलम 185 नुसार, गाडी चालवताना मद्यपान केल्याचं आढळल्यास 10000 रुपये किंवा 6 महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. तसंच हीच चूक पुन्हा करताना आढल्यास, दोन वर्षांचा कारावास आणि 15000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.
नव्या ट्रॅफिक रुल्सअंतर्गत वाहन चालकाला आपल्या गाडीचे सर्व डॉक्युमेंट्स मोबाईल फोनमध्ये स्टोर करावे लागतील. जर ट्रॅफिक पोलीसांनी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर कोणत्याही संबंधित कागदपत्राची मागणी केल्यास, वाहन चालक मोबाईलमधील सॉफ्ट कॉपी दाखवू शकतो. रस्ते सुरक्षा नियम 2020 - - नव्या कायद्यांतर्गत ड्रायव्हिंग लायसन्स नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना 1 लाखांचा दंड भरावा लागू शकतो. रस्त्यावर वेगात गाडी चालवल्यास, 1000 ते 2000 रुपये दंड भरावा लागू शकतो. - रस्ते सुरक्षा नियमांतर्गत, जर एखादा अल्पवयीन गाडी चालवताना आढळल्यास त्याला 25 हजार रुपये दंड आणि त्याच्या गाडीचं रजिस्ट्रेशन रद्द केलं जाईल. तसंच अल्पवयीन 25 वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स बनवू शकणार नाही. - New Traffic Rules अंतर्गत, ड्रायव्हिंगवेळी फोनवर बोलताना आढळल्यास, ट्रॅफिक जम्प करणारे, चुकीच्या दिशेने ड्रायव्हिंग करणारे, धोकादायक ड्राईव्ह करणाऱ्यांना मोठा दंड भरावा लागू शकतो. रहदारी नियमांचं उल्लंघन - - सामान्य जुनं चलान - 100 रुपये, नवीन चलान - 500 रुपये - रस्ता नियम उल्लंघन जुनं चलान - 100 रुपये, नवीन चलान - 500 रुपये - वाहतूक अधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन जुनं चलान - 500 रुपये, नवीन चलान - 2000 रुपये - विना लायसन्स वाहनाचा अनधिकृत वापर जुनं चलान - 1000 रुपये, नवीन चलान - 5000 रुपये - विना ड्रायव्हिंग लायसन्स वाहन चालवणं जुनं चलान - 500 रुपये, नवीन चलान - 5000 रुपये - सक्षम नसतानाही वाहन चालवणं जुनं चलान - 500 रुपये, नवीन चलान - 10000 रुपये - अधिक वेग असल्यास जुनं चलान - 400 रुपये, नवीन चलान - 1000 रुपये - धोकादायक ड्रायव्हिंग जुनं चलान - 1000 रुपये, नवीन चलान - 5000 रुपयांपर्यंत - मद्यपान करुन ड्रायव्हिंग करणं जुनं चलान - 2000 रुपये, नवीन चलान - 10000 रुपये - रेसिंग जुनं चलान - 500 रुपये, नवीन चलान - 5000 रुपये - परमिटशिवाय वाहन चालवणं जुनं चलान - 5000 रुपयांपर्यंत, नवीन चलान - 10000 रुपयांपर्यंत - एग्रेगेटर (लायसन्स नियमांचं उल्लंघन) जुनं चलान - काही नाही, नवीन चलान - 25000 हजार ते 1 लाखपर्यंत - ओव्हरलोडिंग जुनं चलान - 2000 रुपये आणि प्रति अतिरिक्त टनवर 1000 रुपये, नवीन चलान - 20000 रुपये आणि प्रति अतिरिक्त टनवर 2000 रुपये - प्रवाशांचं ओव्हरलोडिंग जुनं चलान - काही नाही, नवीन चलान - 1000 रुपये प्रति अतिरिक्त प्रवासी - सिल्ट बेल्ड न लावल्यास जुनं चलान - 100 रुपये, नवीन चलान -1000 रुपये - टू-व्हिलरवर ओव्हरलोडिंग जुनं चलान - 100 रुपये, नवीन चलान - 2000 रुपये आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स अयोग्य - हेल्मेट न घातल्यास जुनं चलान - 100 रुपये, नवीन चलान - 1000 रुपये आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स अयोग्य