JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / World Cup : ‘ही’ एक चूक पडणार महागात, विराटला 'गंभीर' इशारा

World Cup : ‘ही’ एक चूक पडणार महागात, विराटला 'गंभीर' इशारा

विश्वचषकाआधी वर्ल्ड कप कोण जिंकेल हे सांगणे कठिण असली भारताचा संघ हा सर्वोत्तम आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 मे : आयपीएलचे रणसंग्राम संपले असून मुंबईनं यात बाजी मारली. त्यामुळं आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते, विश्वचषकाकडे. 30 मेपासून इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज आहे. दरम्यान विजेतेपदाच्या दावेदारांमध्ये विराटसेना सध्या अव्वल क्रमांकावर आहे. दरम्यान या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी बीसीसीआयनं 15 खेळाडूंची निवड केली, यावरून बरेच वाद झाले. त्यात आता भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याची भर पडली आहे. गंभीरच्या मते, भारतीय संघ हा सर्वोत्तम खेळाडूंचा हा संघ असला तरी, निवड समितीची ही एक चूक भारतीय संघाला महागात पडू शकते. इंग्लंडमध्ये विश्वचषक होणार असल्यामुळं इंग्लंडमधल्या खेळपट्टीवर भारताला एका चौथ्या जलदगती गोलंदाजाची उणीव जाणवणार आहे. हार्दिक पांड्या किंवा विजय शंकर ती भरून काढू शकत नाही, असे ठाम मत त्यानं व्यक्त केलं आहे. गंभीरनं विश्वचषकाआधी वर्ल्ड कप कोण जिंकेल हे सांगणे कठिण असली भारचा संघ हा सर्वोत्तम आहे. दरम्यान, “जो संघ ग्रुप स्टेजमध्ये चांगली कामगिरी करेल, तो उत्तरार्धात यशस्वी होईलच असे नाही. त्यामुळं प्रत्येक संघाला सातत्य राखणे गरजेचे आहे. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड हे संघ कागदावर तरी मजबूत वाटत आहे. ऑस्ट्रेलिया संघात डेव्हिड वॉर्नर व स्टीव्हन स्मिथ परतल्यानं ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत झाला आहे. तर, इंग्लंडला घरच्या प्रेक्षकांचा फायदा आहे’’, असे मत व्यक्त केले. वाचा- IPL 2019: गुडघ्यातून रक्तस्राव सुरू असतानाही तो धोनीसाठी मैदानात लढत होता तर, भारतीय संघाबाबत बोलताना गंभीरनं, “भारतीय संघासाठी विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह हे चार खेळाडू महत्त्वाचे आहेत. तर, बुमराह हा भारतासाठी हुकुमी एक्का ठरले. पण, बुमराह, मोहम्मद शमी व भुवनेश्वर कुमार यांना साहाय्य करणारा एक जलदगती गोलंदाज संघात हवा होता, असे गंभीरने सांगितले. सध्या भारतीय संघात बुमराह, मोहम्मद शमी व भुवनेश्वर कुमार हे जलद गोलंदाज आहेत. तर, पांड्या व शंकर हे जलदगती गोलंदाजी करू शकतात, परंतु ते पर्याय ठरू शकत नाहीत. त्यामुळं चौथा गोलंदाज हा भारतासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. असा आहे भारतीय संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा. वाचा- आयपीएलमध्ये भारताला सापडला ‘कॅप्टन कूल’, यानं केले विराटच्या कॅप्टन्सीला चॅलेंज वाचा- तुम्ही IPL पाहण्यात होता दंग, तर इंटरनेटवर गाजत होती मुंबईची ‘ही’ हॉट फॅन कुख्यात गुंडाचा ‘वाढीव’पणा, शस्त्रासह टिक टॉकवर बनवला VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या