JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / World Athletics Championships : बीडच्या अविनाश साबळेची फायनलमध्ये धडक, ऐतिहासिक कामगिरीपासून एक पाऊल दूर

World Athletics Championships : बीडच्या अविनाश साबळेची फायनलमध्ये धडक, ऐतिहासिक कामगिरीपासून एक पाऊल दूर

अमेरिकेत सुरू असलेल्या वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Athletics Championships) अविनाश साबळेनं (Avinash Sable) फायनलमध्ये धडक मारली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 जुलै : अमेरिकेत सुरू असलेल्या वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Athletics Championships)   अविनाश साबळेनं (Avinash Sable) फायनलमध्ये धडक मारली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अविनाशनं 3 हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये (Steeplechase) फायनल गाठली आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व केलेल्या अविनाशनं 8 मिनिटं आणि 18.75 सेकंद वेळ घेत तिसरा क्रमांक पटकावत फायनल गाठली आहे. फायनलमध्येही त्यानं याच पद्धतीची सर्वोत्तम कामगिरी केल्यास तो पदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी करू शकतो. 27 वर्षांचा अविनाश सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्यानं जून महिन्यात झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत 8 मिनिट 12.48 सेकंद वेळ घेत स्वत:चाच रेकॉर्ड तोडला होता. यापूर्वी त्यानं 8 मिनिटे 16 सेकंद अशी सर्वोत्तम कामगिरी केली होती. अविनाशनं तब्बल 4 सेकंद कमी वेळ घेत नवा रेकॉर्ड केला होता. यावेळी त्यानं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेल्या खेळाडूला देखील मागे टाकले होते.

संबंधित बातम्या

अविनाशनं यापूर्वी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतही त्याची सर्वोत्तम कामगिरी केली होती. पण, त्यावेळी त्याला फायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले होते. टोक्यो ऑलिम्पिकनंतर त्याला कोरोना झाला होता. त्याचा मोठा परिणाम त्याच्या नियमित सरावावर झाला. पण, जिद्दी अविनाशननं कोरोनावर मात कर ट्रॅकवर पुनरागमन केले. T20 World Cup: टीम इंडिया 15 वर्षांचा दुष्काळ संपवणार का? ग्रुपमध्ये हे संघ झाले फिक्स मुरली श्रीशंकरही फायनलमध्ये भारताच्या मुरली श्रीशंकरनंही लांब उडी स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. त्यानं ग्रुप 8 मधून दुसऱ्या क्रमांकासह फायनल गाठली. मुरलीनं यावर्षी झालेल्या फेडरेशन कप स्पर्धेत 8.36 मीटर लांब उडी मारली होती. आता फायनलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या