JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / जागतिक महिला दिन विशेष: WPLमध्ये सर्वात महाग ठरलेल्या स्मृतीचा कसा आहे संघर्षमय प्रवास? जाणून घ्या

जागतिक महिला दिन विशेष: WPLमध्ये सर्वात महाग ठरलेल्या स्मृतीचा कसा आहे संघर्षमय प्रवास? जाणून घ्या

International Women’s Day : महिला प्रीमियर लीगच्या लिलावात सर्वाधिक बोली लागल्यामुळे सध्या स्मृती मंधाना खूप चर्चेत आहे. पण तिचा क्रिकेटचा प्रवास हा खूप संघर्षमय राहिला असून क्रिकेटमधील या यशस्वी महिला खेळाडूला जागतिक महिला दिनाच्या निमित्तान सलाम!

जाहिरात

smriti mandhana

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 मार्च : आठ मार्च, जागतिक महिला दिन. या दिनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला एका अशा तरुण भारतीय महिला क्रिकेटपटूच्या संघर्षमय प्रवासाची माहिती देणार आहोत, जी महिला प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठीच्या लिलावात सर्वाधिक बोली लागलेली खेळाडू ठरलीय. तिला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू अर्थात आरसीबीनं 3.40 कोटी रूपयांना करारबद्ध केलंय. भारतीय महिला क्रिकेट टीमची ही स्टार क्रिकेटपटू म्हणजे महाराष्ट्रातील सांगलीची स्मृती मंधाना. महिला प्रीमियर लीगच्या लिलावात तिनं इतिहास रचलाय. पण महाराष्ट्रातील सांगली या शहरातून आलेल्या स्मृतीचा आजपर्यंतचा प्रवास हा खूपच संघर्षमय राहिलाय. सांगली या महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरात वाढलेल्या स्मृती वयाच्या 9 व्या वर्षी क्रिकेटच्या विश्वात प्रवास सुरू झाला. तसं ती लहानपणापासूनच क्रिकेट खेळत होती पण वयाच्या 9 व्या वर्षी तिची महाराष्ट्र अंडर 15 राज्य टीमध्ये खेळण्यासाठी निवड झाली होती. दोन वर्षांनंतर, तिला महाराष्ट्र अंडर-19 मध्ये संधी मिळाली. तिचे वडील आणि तिच्या आयुष्यातील पहिले क्रिकेट कोच श्रीनिवास यांनी तिला त्यावेळचे ज्युनिअर स्टेट कोच अनंत तांबवेकर यांच्याकडे क्रिकेटचे धडे घेण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. ज्या वयात बहुतेक मुलांना त्यांच्या पालकांकडून कठोर अभ्यास करण्यासाठी, शाळेत जाण्यासाठी आणि नंतर ट्युशनला जाण्यासाठी आग्रह केला जात होती, आणि न गेल्यास शिक्षा केली जात होती त्या वेळेस स्मृतीचा दिनक्रम हा थोडासा वेगळा होता. सांगलीत मुलींना नेट्समध्ये खेळताना पाहून स्मृती का थक्क झाली? पाहा VIDEO   असा होता दिनक्रम आज एक यशस्वी क्रिकेटपटू म्हणून यशाच्या शिखरावर असणाऱ्या स्मृतीचा शालेय जीवनातील दिनक्रम हा खूपच कठीण होता. ती रोज सकाळी क्रिकेटचा सराव करायची. त्यानंतर शाळेत जायची आणि संध्याकाळी पुन्हा क्रिकेटच्या मैदानात सरावासाठी दिसायची. सांगली या महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरात ती लहानाची मोठी झाली. पण याचा फायदा झाल्याचं ती सांगत असते. कारण सांगलीमध्ये शाळा, क्रिकेटचं मैदान हे तिच्या घरापासून जवळ होतं. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये घरापासून मैदानापर्यंत जाण्यात वेळ बराच जातो तो सांगलीत वाचत होता. स्मृतीनं अलीकडेच एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, ‘आमच्या येथे क्रिकेटच्या मैदानावर मुलांनी खेळण्याचा सराव पूर्ण केल्यानंतर त्यापैकी कोणीही मी बॅटिंगचा सराव करीत असताना मला पाहिजे तितक्या वेळ बॉलिंग करू शकत होते. मोठ्या शहरांमध्ये मला असा सराव करता आला नसता.’ 22 व्या वर्षी अर्जुन पुरस्कारानं सन्मान वयाच्या 15 व्या वर्षी देशांतर्गत आणि राष्ट्रीय वयोगटातील क्रिकेटमध्ये स्मृती खूपच चांगली कामगिरी करत होती. देशातील सर्वोत्तम बॉलर्सविरुद्ध खेळताना ती नियमितपणे रन काढत होती. तिच्या या कामगिरीच्या बळावरच तिला वयाच्या 17 व्या वर्षी महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट टीमचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. 2013 मध्ये तिची भारतीय महिला क्रिकेट टीममध्ये निवड झाली होती, पण काही कारणानं तेव्हा तिचा टीममध्ये समावेश झाला नव्हता. पण तिने प्रामाणिकपणे क्रिकेट खेळणं सुरू ठेवलं, आणि तिचा पुढे भारतीय महिला क्रिकेट टीममध्ये समावेश झाला. सध्या स्मृती टीम इंडियाची उपकॅप्टन आहे WPL 2023 : वडील शेतकरी, आई गृहिणी; सोलापूरच्या लेकीने गुजरातविरुद्ध झळकावलं अर्धशतक संघर्षमय परिस्थितीमध्येही प्रामाणिकपणे क्रिकेट खेळणाऱ्या स्मृतीला क्रिकेटच्या विश्वात अनेक कोच लाभले. त्या कोचपैकी एक असणाऱ्या अमृता शिंदे यांनी भाकीत केलं होतं की, ‘स्मृती ही वयाच्या 22 व्या वर्षी अर्जुन पुरस्कार जिंकेल.’ विशेष म्हणजे हे भाकीत खरं ठरलं, आणि तिला अर्जुन पुरस्कारही मिळाला. तसंच तिला आयसीसी महिला वन-डे ‘प्लेयर ऑफ द इयर’ हा पुरस्कारदेखील मिळालाय. त्यातच आता ती महिला प्रीमियर लीगच्या लिलावात सर्वांत महागडी खेळाडू ठरलीय. आरसीबीनं 3.4 कोटी रुपयांना स्मृतीला करारबद्ध केलं. तिच्यानंतर महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्मा हिच्यावर 2.4 कोटी रुपयांची बोली लागली होती. मात्र, शर्मा पेक्षाही स्मृतीला जवळपास एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत देऊन खरेदी करण्यात आलं आहे. अर्थात यावर आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. कारण स्मृती ही महिला क्रिकेटविश्वात सर्वांत प्रसिद्ध टी-20 खेळाडू म्हणून ओळखली जात नाही. तिची टी-20 क्रिकेटमधील आंतरराष्ट्रीय सरासरी 27.32 आहे. मात्र, क्रिकेट खेळतानाचा तिचा प्रामाणिकपणा आणि आक्रमकपणा पाहता तिला मिळालेली किंमत ही योग्यच असल्याचं तिच्या चाहत्यांच मत आहे. एवढचं नाही, तर ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट टीममधील खेळाडू फोबी लिचफिल्डनंसुद्धा स्मृतीचं कौतुक केलं आहे. कोण आहे तारा? RCBचा अर्धा संघ धाडला तंबूत, WPLच्या लिलावात असोसिएट देशातली एकमेव खेळाडू   काय म्हणाली होती ऑस्ट्रेलियाची खेळाडू? गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट टीम भारताच्या दौऱ्यावर आली होती. तेव्हा बोलताना, ऑस्ट्रेलियन खेळाडू फोबी लिचफिल्डनं स्मृती मंधाना हिचं कौतुक केलं होतं. फोबी हिनं तिचा स्वतःचा खेळ उंचावण्यास मदत केल्याचं श्रेय स्मृतीला दिलं होतं. ती म्हणाली होती, ‘माझ्यासाठी वैयक्तिकरित्या लेफ्टहँड बॅट्सवूमन म्हणून स्मृतीकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. जेव्हा ती डब्लूबीबीएल (WBBL) खेळत होती, तेव्हा मी तिच्याकडून क्रिकेटचे धडे घेण्यासाठी वेळेचा पुरेपूर उपयोग केला. त्यावेळी तिनं मला तिची एक बॅटही दिली होती.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या