ध्या धोनी इतकीच लोकप्रियता त्याची लाडकी लेक झिवाची आहे. तिचा जन्म 6 फेब्रुवारी 2015 ला झाला.
नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आपल्या स्टाईलसाठी आणि बिंदास अंदाजासाठी ओळखला जातो. त्याच्या स्टाईलमुळं अनेकवेळा त्याला ट्रोलही करण्यात आले आहे. मात्र नुकताच रणवीरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणवीरचा फोटो पाहून भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) ची मुलगी हैराण झाली आहे. महेंद्रसिंग धोनी गेले तीन महिने क्रिकेटपासून लांब आहे. त्यामुळं धोनी सध्या जास्तीत जास्त वेळ हा आपल्या कुटुंबासोबत घालवत आहे. दरम्यान रणवीरच्या एका फोटोवर धोनीची मुलगा झिवा हिनं चक्क त्याच्यावर आरोप केला आहे. झिवानं धोनीला रणवीरनं माझे ग्लासेस का घेतले? असा सवालही विचारला. रणवीरनं घातलेले ग्लासेस झिवाकडेही आहेत. हे सगळं प्रकरण धोनीनं स्वत: इन्स्टाग्रामवर टाकले. धोनीनं इन्स्टाग्रामवर, “झिवानं मला विचारलं की रणवीरनं माझे ग्लासेस का घातले आहे. त्यानंतर तिनं घरी जाऊन माझे ग्लासेस माझ्याकडे आहेत”, असे लिहिले.
धोनीच्या या पोस्टवर रणवीरनं रिअॅक्शन दिली आहे. रणवीरनं या पोस्टवर फॅशनिस्टा अशी कमेंट केली आहे. रणवीर बरोबरच हार्दिक पांड्यानेही या फोटोवर कमेंट केली आहे. झिवा ही तिच्या क्युट फोटोमुळं सोशल मीडियावर चर्चेत असते. तर, धोनीनं वर्ल्ड कप 2019मध्ये शेवटचा सामना खेळला होता. त्यामुळं धोनी निवृत्ती घेणार की पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असा सवाल चाहते विचारत आहेत.
दुसरीकडे रणवीर सिंह लवकरच 83 या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमा 1983मध्ये कपिल देव यांच्यात संघानं जिंकलेल्या पहिल्या वर्ल्ड कपवर आधारित आहे. या सिनेमात रणवीरसोबतच दीपिका पदुकोण, ताहिर भसीन, साकिब सलीम, साहिल खट्टर, एमी विर्क, हार्डी संधू आणि अन्य कलाकार असणार आहे. आईच्या कुशीतून 8 महिन्यांच्या बाळाला पळवलं, धक्कादायक CCTV VIDEO