JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / भारतात चेंडूशी छेडछाड, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा 4 सेकंदाचा VIDEO VIRAL

भारतात चेंडूशी छेडछाड, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा 4 सेकंदाचा VIDEO VIRAL

ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यानंतर आता आणखी एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा चेंडूशी छेडछाड करत असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : क्रिकेटमध्ये चेंडूशी छेडछाड असं उच्चारलं की स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचे पत्रकार परिषदेतले रडणारे चेहरे डोळ्यासमोर येतात. दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या या दोन खेळाडूंनी केलेल्या चेंडू छेडछाड प्रकरणानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. त्यानंतर दोघांवरही बंदी घालण्यात आली होती. बंदीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर दोघांनी जबरदस्त पुनरागमन केलं. वॉर्नरने वर्ल्डकपमध्ये तर स्मिथने अॅशेस मालिकेत धावांचा पाऊस पाडला. त्यानंतर आता आणखी एका क्रिकेटपटूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात विंडीजचा खेळाडू निकोलस पूरन चेंडूशी छेडछाड करत असल्यासारखं दिसत आहे. विंडीजचा युवा फलंदाज निकोलस पूरनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओ पाहिल्यावर निकोलस चेंडूशी छेडछाड करत आहे की काय असा संशय येतो. यामध्ये निकोलस चेंडू पायावर घासताना त्याला नखांनी स्क्रॅच करताना दिसत आहे. हा व्हिडिओ लखनऊमधील अकाना स्टेडियमवरचा आहे. या ठिकाणी अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना सुरू होता. मात्र, आतापर्यंत निकोलसने चेंडूशी छेडछाड केली की नाही हे स्पष्ट झालेलं नाही. पूरनविरुद्ध तक्रार झाली असती तर त्याला बंदीच्या कारवाईला सामोरं जावं लागलं असतं.

संबंधित बातम्या

चेंडूच्या छेडछाडीत निकोलस पूरन दोषी आढळला तर विंडीजला मोठा धक्का असेल. सध्याच्या संघात तो फॉर्ममध्ये असलेला फलंदाज आहे. त्याची एकदिवसीय सरासरी 44.58 इतकी असून 14 डावात एक शतक आणि 3 अर्धशतकं केली आहेत. टी20 मध्येही तो फटकेबाजीसाठी ओळखला जातो. लखनऊमध्ये सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विंडीजने अफगाणिस्तानला क्लीन स्विप केलं. तिसऱ्या टी20 मध्ये विंडिजसमोर 250 धावांचे आव्हान होते ते त्यांनी 48.4 षटकांत पूर्ण केलं. विंडीजच्या विजयाचा शिल्पकार शाय होप ठरला. त्याने नाबाद 109 धावांची खेळी केली. तर पदार्पण करणाऱ्या ब्रॅडन किंगनं 39 धावा केल्या. त्यानतंर रॉस्टन चेजने नाबाद 42 तर पोलार्डने 32 धावा केल्या. VIDEO : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल का? घटनातज्ज्ञ म्हणतात…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या