नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं क्रिकेटपासून विश्रांती घेतली आहे. वर्ल्ड कप 2019नंतर विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये शानदार कामगिरी केली. दक्षिण आफ्रिका संघाला व्हाईटवॉश देत आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान 2 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या बांगलादेश दौऱ्यासाठी विराटला विश्रांती देण्याता आली आहे. त्यामुळं रोहित शर्मा टीम इंडियाचा टी-20 कर्णधार असणार आहे. दरम्यान, या सगळ्यात आता सर्वात मोठी बातमी आली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबाच्या रडारवर आहे. गुप्तचर यंत्रणेनं जारी केलेल्या यादीमध्ये विराटच्या नावाचा समावेश आहे. पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे की दहशतवाद्यांच्या रडारवर क्रिकेटपटू आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या वातावरणाचा परिणाम क्रिकेटवर झाला आहे. वाचा- पुढच्या महिन्यात होणार भारत-पाक सामना? असा आहे BCCIचा प्लॅन भारत-पाकिस्तान यांच्यात 2012 पासून एकही सामना झालेला नाही. दरम्यान सध्या चांगल्या फॉर्ममध्य़े असलेला विराट कोहली दहशतवाद्यांच्या रडारवर असल्यामुळं विराटच्या सुरक्षेत वाढ करण्यात येऊ शकते. एबीपीनं दिलेल्या माहितीनुसार गुप्तचर यंत्रणेकडून 12 जणांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, निर्मला सितारामण, सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नावाचाही समावेश आहे. दरम्यान विराटचे नाव या यादीत असल्यामुळं खळबळ माजली आहे. वाचा- टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, बांगलादेशचे खेळाडू सोडणार भारत! क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. पुढच्या आठवड्यात बांगलादेश विरोधात नवी दिल्ली येथे पहिला टी-20 सामना होणार आहे. मात्र बांगलादेश विरोधातील दौऱ्यात विराटला विश्रांती दिल्यामुळं टीम इंडियाची सुरक्षाही वाढवण्यात आली. ऑल इंडिया लष्कर ए तोयबाच्या या माहितीमुळं या लिस्टमध्ये असलेल्या 12 जणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. वाचा- मुंबई इंडियन्स संघात सामिल होणार ‘पप्पू’, रोहित देणार का संधी?