JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 17 वर्षांच्या गोलंदाजाचा कहर! 175 किमी वेगाने चेंडू टाकत मोडला अख्तरचा वर्ल्ड रेकॉर्ड?

17 वर्षांच्या गोलंदाजाचा कहर! 175 किमी वेगाने चेंडू टाकत मोडला अख्तरचा वर्ल्ड रेकॉर्ड?

मलिंगा स्टाईल गोलंदाजी करणारा मथीशा पथिराना (Matheesha Pathirana) या सामन्यात चक्क 175 किमी वेगाने चेंडू टाकला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

केप टाऊन, 21 जानेवारी : सध्या दक्षिण आफ्रिकेत आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप खेळला जात आहे. यातील भारत-श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात 17 वर्षांच्या युवा खेळाडूनं आपल्या गोलंदाजीनं कहर केला आहे. मलिंगा स्टाईल गोलंदाजी करणारा मथीशा पथिराना (Matheesha Pathirana) या सामन्यात चक्क 175 किमी वेगाने चेंडू टाकला. श्रीलंकेच्या या युवा खेळाडूनं मथिशा पथिराना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. वर्ल्ड कपमध्ये 175 किमी वेगाने चेंडू टाकल्याचे दिसत आहे. ही चेंडू व्हाईड होते, भारताचा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालला हा सगळ्यात जलद चेंडू टाकला होता. मात्र नंतर कळले की स्पीड पाहणाऱ्या मशीनमध्ये गडबड झाल्याचे दिसून आले. त्यामुळं चेंडू टाकण्याच्या आधीची गती 175 किलोमीटर प्रतिताशी दाखवण्यात आली. वाचा- ऑस्ट्रेलियाच्या मदतीसाठी धावून आला सचिन! आता थेट होणार कोच

वाचा- कॅप्टन कोहलीच्या एका चुकीमुळे भारत गमावणार टी-20 वर्ल्ड कप? क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू क्रिकेटच्या इतिहासातील वेगवान वेगवान गोलंदाजीचा विक्रम पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याच्या नावावर आहे. 2003मध्ये इंग्लंडविरुद्ध अख्तरने ताशी 161.3 किमी वेगाने गोलंदाजी केली. वाचा- शतकी खेळीनंतरही हिटमॅनला नाही मिळाला नंबर-1चा ताज! रोहित-विराटमध्ये संघर्ष 175 किमी वेगाने गोलंदाजी करणे शक्य कोणत्याही वेगवान गोलंदाजीला अशा वेगाने गोलंदाजी करणे शक्य नाही, जर श्रीलंकेच्या 17 वर्षीय मतिषाने ताशी 175 किमी वेगाने गोलंदाजी केली तर ते आश्चर्यकारकपेक्षा कमी ठरणार नाही. टेनिसमधील वेगवान सेवेचा वेग 263.4 किमी आहे तर बॅडमिंटनमध्ये वेगवान स्मॅश ताशी 493 किमी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या