नवी दिल्ली: सध्याच्या काळात खेळाडूंचे अर्थिक उत्पन्न नेमके किती आहे, याविषयी जाणून घेण्याची फॅन्समध्ये मोठी उत्सुकता असते. अनेकदा काही खेळाडूंच्या कमाईचे आकडे हे आश्चर्यचकीत करणारे असतात. सध्या अशीच एक लढत चर्चेत असून, या लढतीत एका खेळाडूने एका दिवसांत 742 कोटी रुपये कमावले आहेत. टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) जगातील सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये समावेश आहे. दरवर्षी 196 कोटी रुपयांची कमाई करणारा विराट कोहली हा फोर्ब्सच्या (Forbes) यादीतील सर्वांत श्रीमंत खेळाडू (Richest Player) आहे. मात्र अमेरिकेतील एक खेळाडू सध्या विराट कोहलीच्या तुलनेत वरचढ ठरला आहे. या खेळाडूने एकाच दिवसात सुमारे 742 कोटींची कमाई केली आहे. ही कमाई विराटच्या वार्षिक कमाईच्या तुलनेत कित्येक पटींनी जास्त मानली जाते. या खेळाडूने कमाईबाबतची पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) टाकली आहे. त्याची ही पोस्ट पाहून नेटिझन्सने आश्चर्य व्यक्त केले आहे. अबब! खोटी मॅच खेळून त्याने कमावले तब्बल एवढे रुपये, विराटही वाटेल गरीब बॉक्सरने एकाच लढतीत कमावेल 100 दशलक्ष डॉलर्स झी न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे. टीम इंडियाचा कर्णधार आणि सर्वोत्तम क्रिकेटर विराट कोहली याचा समावेश जगातील सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये होतो. त्याच बरोबर लक्झरी जीवनशैलीसाठी देखील विराट प्रसिध्द आहे. विराट कोहली हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर आहे. दरवर्षी 196 कोटी रुपयांची कमाई करणारा विराट फोर्ब्सच्या यादीतील श्रीमंत क्रिकेटर आहे. परंतु, अमेरिकेतील एका खेळाडूने विराटच्या वार्षिक कमाईच्या तुलनेत एका दिवसात तिप्पट कमाई केली आहे. फ्लॉयड मेवेदर (Floyd Mayweather) असं या खेळाडूचं नाव असून, तो प्रोफेशन बॉक्सर (Boxer) आहे. मेवेदरने एका दिवसात 742 कोटी रुपये कमावले असून, याबाबतची माहिती त्याने स्वतः इन्स्टाग्रामवरुन दिली आहे. त्यानं सांगितलं की युट्युबर लॉगन पॉल (Youtuber Logan Paul) याच्या सोबत झालेल्या लढतीत मी सुमारे 100 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे. भारतीय खेळाडूकडून गोव्यात झाली चूक; रंगेहाथ पकडल्यानंतर भरावा लागला दंड
आतापर्यंत एकही लढत न हरलेला खेळाडू मेवेदरने आतापर्यंतच्या आपल्या करिअरमध्ये एकाही लढतीत हार पत्करलेली नाही. त्याने 2017 मध्ये बॉक्सिंगमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. मेवेदरकडे अलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. तसेच त्याच्याकडे खाजगी जेट असून त्याची किंमत सुमारे 334 कोटी रुपये आहे. बनावट लढतीतून केली कमाई मेवेदर आणि लॉगन यांच्यात झालेली ही लढत बनावट होती. स्वतः मेवेदरने याबाबत खुलासा केला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाला आहे. त्यात त्याने एका बनावट लढतीत मी 100 दशलक्ष डॉलर्सची कमाई केल्याचं म्हटलं आहे.