मुंबई, 17 जानेवारी : बीसीसीआयने गुरुवारी खेळाडूंसोबतचा वार्षिक करार जाहीर केला आहे. यामध्ये 27 खेळाडूंचा समावेश असून धोनीचे नाव मात्र यातून वगळ्यात आले आहे. मुख्य म्हणजे या करारात चार मुंबईकर खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयनं या करारात प्रामुख्याने चार गट केले आहेत. ग्रेड A मध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना वर्षाकाठी सात कोटी रुपये, ग्रेड Aच्या खेळाडूंना पाच कोटी रुपये दिले जातात. त्याचबरोबर ग्रेड B मधील तीन कोटी आणि ग्रेड Cच्या खेळाडूंना एक कोटी रुपये दिले जातात. वाचा- धोनीसह चार खेळाडूंना BCCI ने दिला डच्चू, एकाने घेतली होती निवृत्ती
वाचा- धोनीला वगळल्यानंतर चाहते झाले भावूक, अखेर BCCIला द्यावं लागलं कारण या चार मुंबईकर खेळाडूंचा समावेश BCCI ने कराराबद्ध केलेल्या खेळाडूंमध्ये भारताचा सलामीवीर आणि उप-कर्णधार रोहित शर्मा ग्रेड A+मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या तीन खेळाडूंच्या यादीत त्याला स्थान देण्यात आले आले. त्याच्याशिवाय या यादीत विराट, जसप्रीत यांचा समावेश आहे. रोहितला प्रतिवर्ष 7 कोटी इतके मानधन मिळणार आहे. त्याखालोखाल A या श्रेणीत मुंबईकर अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली आहे. अजिंक्य रहाणेला प्रतिवर्ष 5 कोटी मिळणार आहेत. B श्रेणीत कोणत्याही मुंबईकराला स्थान देण्यात आलेले नाही. तर, C श्रेणीमध्ये शार्दूल ठाकूर आणि श्रेयस अय्यर यांना स्थान देण्यात आले आहे. या खेळाडूंना प्रतिवर्ष 1 कोटी मानधन मिळणार आहे. वाचा- विराट, रोहित आणि बुमराहची चांदी; तर धोनीला दररोज 2 लाखांचा फटका ग्रेड Aमध्ये ऋषभ पंतचा समावेश बीसीसीआयच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या या करारात ग्रेड Aमध्ये एकूण 11 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत असेलल्या खेळाडूंना दरवर्षी 5 कोटी रुपये दिले जातील. यामध्ये आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी या गोलंदाजांचा तर चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, के. एल. राहुल, शिखर धवन आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, ग्रेड बीमध्ये ऋद्धिमान साहा (Wriddhiman Saha), उमेश यादव (Umesh Yadav), यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या आणि मयंक अग्रवाल यांचे नाव तीन कोटींच्या यादीत टाकण्यात आले आहे.