लंडन, 16 सप्टेंबर : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पाचव्या अॅशेस सामन्यात एक अजब प्रकार घडला. मुख्य म्हणजे तब्बल 43 वर्षांनी पहिल्यांदाच अॅशेस मालिकात अनिर्णित राहिली. यातच एका गोलंदाजानं अखेरच्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा कसोटी क्रिकेटमधला नो-बॉल टाकला. मुख्य म्हणजे तिसऱ्या पंचांनी हा चेंडू नो बॉल असल्याचे घोषित केले. अॅशेस 2019मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांची मालिका 2-2नं बरोबरीत सुटली. पाचव्या सामन्यात इंग्लंडनं बाजी मारली. मात्र, सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा जलद गोलंदाज क्रिस वोक्सनं आपल्या कसोटी क्रिकेटमधील करिअरमधला पहिला नो-बॉल टाकला. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच वोक्सनं नो-बॉल टाकला. ऑस्ट्रेलियाचा डावात 31व्या ओव्हरमध्ये दुसऱ्या चेंडूवर हा प्रकार घडला. वोक्सच्या समोर मिचेल मार्श फलंदाजी करत होता. दरम्यान, त्याच ओव्हरमध्ये वोक्सनं मार्शला बाद केले. एकीकडे वोक्स आनंद व्यक्त करत असताना पंचांनी मार्शला पुन्हा मागे बोलावून घेतले. कारण हा चेंडू नो-बॉल होता. त्यामुळं वोक्सच्या नावावर एक लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली. 30 वर्षीय ऑलराऊंडर खेळाडू क्रिस वोक्सनं ऑस्ट्रेलिया विरोधात झालेल्या अखेरच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात केवळ एक विकेट घेतली. यात त्यानं ऑस्ट्रेलियाचा हुकुमी एक्का असलेल्या स्टिव्ह स्मिथला बाद केले. स्मिथ या मालिकेत सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला. वाचा- वाद काही संपेना! LIVE सामन्यात बेन स्टोक्सनं वॉर्नरला घातल्या शिव्या 5200 चेंडूंनंतर टाकला नो-बॉल मैदानावर असलेल्या पंचांना आधीच दिसले होते की वोक्सचा पाय सीमारेषेच्या पुढे आहे. त्यामुळं मार्शला बाद घोषित करण्याआधी पंचांनी तिसऱ्या पंचांनी तिसऱ्या पंचांचा निर्णय मागितला. चेंडू नो-बॉल असल्यामुळं मार्शला नाबाद घोषित करण्यात आले. मुख्य म्हणजे वोक्सनं आपल्या कसोटी करिअरमध्ये 5200 चेंडू टाकल्यानंतर 867 ओव्हरनंतर पहिला नो-बॉल टाकला. वाचा- इंग्लंडचा 135 धावांनी विजय! अॅशेस मालिका बरोबरीत पाचव्या कसोची मालिकेत इंग्लंडचा विजय इंग्लंडनं दिलेल्या 399 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक माऱ्यापुढे स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या अन्य फलंदाजांनीसुद्धा शरणागती पत्करली. त्यामुळे पाचव्या अॅशेस कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवसीच ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला. ऑस्ट्रेलिया सर्वात मोठा झटका तेव्हा बसला जेव्हा 27वया ओव्हरमध्ये स्मिथची विकेट गेली. या मालिकेत पहिल्यांदा स्मिथ 50 पेक्षा कमी धावा करत बाद झाला. तत्पूर्वी इंग्लंडचा शनिवारचा 8 बाद 313 धावांवरून पुढे खेळताना दुसरा डाव 329 धावांवर संपुष्टात आला.त्यामुळे ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी 399 धावांचे अशक्यप्राय असे आव्हान उभे केले. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यातच भरवशाच्या स्मिथला त्याने 23 धावांवर लेग स्लीपमध्ये उभ्या असलेल्या बेन स्टोक्सकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतरही मिचेल मार्श आणि मॅथ्यू वेड यांनी पाचव्या गडय़ासाठी 63 धावांची भागीदारी रचली. मात्र मार्श लगेच बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळला. वाचा- धोनीशिवाय चेन्नई सुपरकिंग्ज मैदानात उतरणार? श्रीनिवासन यांच्या वक्तव्यानं चर्चा शाई झाली आता मुख्यमंत्र्यांवर जिवंत कोंबड्या फेकल्या, पाहा VIDEO