JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ICC T20 Ranking : रोहित-विराट जवळपासही नाही, हा खेळाडू T20 मध्ये झाला टीम इंडियाचा नंबर वन!

ICC T20 Ranking : रोहित-विराट जवळपासही नाही, हा खेळाडू T20 मध्ये झाला टीम इंडियाचा नंबर वन!

आयसीसीने बुधवारी ताज्या टी-20 क्रमवारीची (T20 Ranking) घोषणा केली आहे. या क्रमवारीमध्ये इशान किशनने (Ishan Kishan) तब्बल 68 स्थानांची उडी घेत सातवा क्रमांक गाठला आहे. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांनाही चांगल्या कामगिरीचा फायदा झाला आहे.

जाहिरात

Photo-BCCI

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दुबई, 15 जून : आयसीसीने बुधवारी ताज्या टी-20 क्रमवारीची (T20 Ranking) घोषणा केली आहे. या क्रमवारीमध्ये इशान किशनने (Ishan Kishan) तब्बल 68 स्थानांची उडी घेत सातवा क्रमांक गाठला आहे. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांनाही चांगल्या कामगिरीचा फायदा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या 5 मॅचच्या सीरिजमध्ये इशान किशनने चांगली कामगिरी केली आहे. किशनने आतापर्यंत 3 मॅचमध्ये 2 अर्धशतकांच्या मदतीने 164 रन केले आहेत, ज्यामुळे तो टॉप-10 मध्ये आला आहे. किशन टॉप-10 मध्ये असलेला एकमेव भारतीय बॅट्समन आहे. त्याच्यानंतर केएल राहुल 14व्या आणि कर्णधार रोहित शर्मा 16व्या, श्रेयस अय्यर 17व्या क्रमांकावर आहेत. विराट कोहलीला 2 स्थानांचं नुकसान झाल्यामुळे तो 21व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. बॉलर्सच्या क्रमवारीमध्ये भुवनेश्वर कुमार 7 स्थान वरती 11व्या आणि लेग स्पिनर युझवेंद्र चहल 4 स्थान वरती 26व्या क्रमांकावर आले आहेत. टॉप-10 मध्ये एकही भारतीय बॉलर नाही, टॉप-20 मध्ये भुवनेश्वर हा एकमेव भारतीय बॉलर आहे. ऑस्ट्रेलियाचा जॉश हेजलवूड टी-20 क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. श्रीलंकेचा महीश तीक्षणा 16 स्थान वरती 8व्या क्रमांकावर आला आहे. बाबर पहिल्या क्रमांकावर कायम बॅट्समनच्या टॉप-5 क्रमवारीमध्येही बदल झाले आहेत, पण पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या क्रमांकावर कायम आहे. मोहम्मद रिझवान 794 पॉईंट्ससह तिसऱ्यावरून दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. डेव्हिड मलान 728 पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर, एरॉन फिंच पाचव्या, डेवॉन कॉनवे सहाव्या, इशान किशन सातव्या, रस्सी व्हॅन डर डुसेन आठव्या, पथुम निसांका नवव्या आणि मार्टिन गप्टील 10व्या क्रमांकावर आहेत. जॉश हेजलवूडने श्रीलंकेविरुद्ध धमाकेदार कामगिरी केल्यामुळे तो तिसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आला आहे. इंग्लंडचा लेग स्पिनर आदिल रशीद दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिकेचा तबरेझ शम्सी पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या