हरियाणा, 25 मार्च : कोरोनाला हरवण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहे. भारतातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदींना 21 दिवसांचा लॉक डाऊन घोषित केला. यामुळे लोकांना घरत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र असे असले तरी डॉक्टर आणि पोलिसांना बाहेर पडावे लागत आहे. यांच्याबरोबरच कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी एक क्रिकेटपटू मैदानात उतरला आहे. या क्रिकेटपटूने भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकून दिला होता. 2007मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये या क्रिकेटपटूने मॅच विनर खेळी केली होती. या क्रिकेटपटूचे नाव आहे जोगिंदर शर्मा. भारताला टी 20 वर्ल्ड चॅम्पियन बनवणारा जोगिंदर शर्मा लोकांना या साथीच्या आजारापासून वाचविण्यात मदत करत आहे. वाचा- लाला हाथ तो मिला लेते! कोरोनाला रोखण्यासाठी पठाण बंधूंची फिल्मी स्टाईल जोगिंदर शर्मा (वय 36) हा हरियाणा पोलिसात डीएसपी आहे आणि तो कोरोना विषाणूच्या विरुद्ध सध्या आपले कर्तव्य बजावत आहे. लॉकडाऊन असूनही जोगिंदर शर्मा रस्त्यावर लोकांना जागृत करत आहेत. घरी राहणे योग्य असल्याचा संदेशही त्याने लोकांना दिला आहे. जोगिंदरने आपले खाकी वर्दीतले फोटो शेअर करत,‘कोरोनाला हरवण्यासाठी आपल्याकडे एकमेव मार्ग आहे. घरात थांबा, सुरक्षित राहा. कृपया आम्हाला सहकार्य करा. जय हिंद’, असा संदेश दिला. वाचा- बेबी डॉलसोबत हॉटेलमध्ये राहणं पडलं महागात, 15 क्रिकेटपटूंना क्वारंटाईन
वाचा- VIDEO: 5 वर्षांच्या लेकीला कोरोनापासून वाचवण्यासाठी क्रिकेटपटूची धडपड भारताला जिंकून दिला होता टी-20 वर्ल्ड कप 2007मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत अंतिम फेरीत पोहचला होता. यावेळी भारताचा सामना पाक संघाशी होता. अटीतटीच्या या सामन्यात शेवटच्या षटकात जोगिंदर शर्माने मिसबाह-उल-हकची विकेट घेऊन भारताला जेतेपद मिळवून दिले होते. मात्र हाच सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना ऑरला. या स्पर्धेत त्याने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन विकेट बाद केले. आंतरराष्ट्रीय टी -20 कारकीर्दीत त्याने 4 सामन्यांत 4 विकेट घेतल्या. टी -20 विश्वचषक जिंकल्यानंतर जोगिंदर शर्मा हरियाणा पोलिसात दाखल झाला.