JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Norway Chess : विश्वनाथन आनंदचा धडाका कायम, वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनचा केला पराभव

Norway Chess : विश्वनाथन आनंदचा धडाका कायम, वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनचा केला पराभव

भारताचा अव्वल बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंदनं (Viswanathan Anand) वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनचा (Magnus Carlsen) पराभव केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 जून : भारताचा अव्वल बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंदनं (Viswanathan Anand) वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनचा (Magnus Carlsen) पराभव केला आहे. नॉर्वेजियन चेस स्पर्धेतील क्लासिकल गटातील पाचव्या फेरीत आनंदनं कार्लसनचा पराभव करत पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यापूर्वी आनंदनं कार्लसनचा चेस ऑफ ब्लिट्ल (बुद्धीबळातील सर्वात लहान स्वरूप) पराभव केला होता. आनंद आणि कार्लसन यांच्यातील मुख्य सामना 40 फेरीनंतर बरोबरीत सुटला. त्यानंतर झालेल्या ‘सडन डेथ’ फेरीत आनंदनं हा विजय मिळवला आहे. आनंदचा क्लासिकल गटातील हा चौथा विजय असून त्याचे आता 10 पॉईंट्स झाले आहेत. तर आनंदचा पारंपारिक प्रतिस्पर्धी कार्लसनचे 9.5 पॉईंट्स असून तो सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. नॉर्वे चेस स्पर्धेत जगातील अव्वल बुद्धीबळपटू सहभागी झाले आहेत. ENG vs NZ : ऐतिहासिक कामगिरीनंतर जो रूट भावुक, कॅप्टनसीचा सांगितला वाईट अनुभव आनंदनं यापूर्वी ब्लिट्स राऊंडमध्ये 43 व्या फेरीनंतर कार्लसनचा पराभव केला होता. त्या मॅचमध्ये आनंद पांढऱ्या मोहऱ्यानं खेळला. हा सामना सुरूवातील अनिर्नित होईल अशीच चिन्ह होती. त्यानंतर कार्लसननं आक्रमक खेळ करत जिंकण्याचा प्रयत्न केला. आनंदनं कार्लसनच्या सर्व चाली उधळून लावत सामना खिशात टाकला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या