JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / All England Championship : लक्ष्य सेनची फायनलमध्ये धडक, 21 वर्षांनी इतिहासाच्या उंबरठ्यावर!

All England Championship : लक्ष्य सेनची फायनलमध्ये धडक, 21 वर्षांनी इतिहासाच्या उंबरठ्यावर!

भारताचा 20 वर्षांचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन (Lakshya Sen) याने इतिहास रचला आहे. लक्ष्यनं ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या (All England Championship) फायनलमध्ये प्रवेश केलाय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 मार्च : भारताचा 20 वर्षांचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन (Lakshya Sen) याने इतिहास रचला आहे. लक्ष्यनं ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या (All England Championship) फायनलमध्ये प्रवेश केलाय. भारतीय खेळाडूनं या स्पर्धेचा विद्यमान चॅम्पियन मलेशियाचा के ली जीयाचा 21-13, 12-21 आणि 21-19 असा पराभव केला. 2001 साली पुलेला गोपीचंदने (Pullela Gopichand) ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये गेलेला लक्ष्य हा पहिला भारतीय पुरूष बॅडमिंटनपटू आहे. ऑल इंग्लंड स्पर्धेच्या एकूण इतिहासात फायनलमध्ये प्रवेश केलेला लक्ष्य हा पाचवा भारतीय आहे. यापूर्वी 2005 साली सायना नेहवालनं स्पर्धेचं उपविजेतेपद पटकावलं होतं. 1980 आणि 1981 साली प्रकाश पदुकोण यांनी स्पर्धेची फायनल गाठली होती.यापैकी एकदा त्यांना विजेतेपद पटकावण्यात यश आले होते. तर 1947 साली प्रकाश नाथ हे या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहचलेले पहिले भारतीय ठरले होते. लक्ष्यनं या स्पर्धेच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये वर्ल्ड रँकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या डेन्मार्कच्या एंडर्स एंटोनसनचा पराभव केला आहे. लक्ष्य सेननं मलेशियाच्या जिया विरूद्ध आक्रमक सुरूवात केली. त्याने पहिला गेम 21-13 असा सहज जिंकला. जियानं दुसऱ्या गेममध्ये पुनरागमन केलं. त्याने सुरूवातीला 11-3 आणि नंतर 16-5 अशी आघाडी घेतली. त्यावेळी लक्ष्यनं प्रतिकार करत सलग 5 पॉईंट जिंकले. पण दुसरा गेम जिंकण्यात त्याला अपयश आले. जियानं तो गेम 21-12 असा जिंकत मॅचमध्ये बरोबरी साधली. IPL 2022 : रोहित करतोय धोनी स्टाईल सराव, VIDEO पाहून विरोधी टीमना भरेल धडकी! तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी जोरदार लढत दिली. अनेक लांब रॅली या गेममध्ये झाल्या. त्यांनी नेट्सवरही चांगले ड्रॉप शॉट्स खेळले. जियाने 11-9 अशी आघाडी घेतली होती. ही आघाडी त्याने 16-12 अशी वाढवली. त्यानंतरही लक्ष्यनं हार स्विकारली नव्हती. त्याने निर्णयाक गेमममध्ये पुनरागमन करत तो गेम 21-19 असा जिंकला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या