JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / जॅकलीनसह private pics leak झाल्यानंतर महाठग सुकेश झालाय डिस्टर्ब, म्हणाला-आमचं प्रेम पैशांसाठी नव्हतं..

जॅकलीनसह private pics leak झाल्यानंतर महाठग सुकेश झालाय डिस्टर्ब, म्हणाला-आमचं प्रेम पैशांसाठी नव्हतं..

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सध्या चर्चेत आहे ते तिच्या फिल्म्समुळे नाही तर तिच्या सुकेश चंद्रशेखरबरोबरच्या (Sukesh Chandrasekhar) रिलेशनमुळे. महाठग समजला जाणारा सुकेश चंद्रशेखर सध्या जेलमध्ये आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 फेब्रुवारी: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सध्या चर्चेत आहे ते तिच्या फिल्म्समुळे नाही तर तिच्या सुकेश चंद्रशेखरबरोबरच्या (Sukesh Chandrasekhar) रिलेशनमुळे. महाठग समजला जाणारा सुकेश चंद्रशेखर सध्या जेलमध्ये आहे. जॅकलीन आणि सुकेश यांचे अगदी खासगी फोटो लिक झालेत. यामुळे महाठग सुकेश चंद्रशेखर वैतगला (Sukesh Chandrasekhar on viral intimate pics with Jacqueline Fernandez) असल्याचं बोललं जातंय.या प्रकरणावर सुकेशनं स्वत:च्या हाताने गुरुवारी (3 फेब्रुवारी) एक नोट लिहीली आहे. जॅकलीनचा या केसशी काहीही संबंध नाही असं सुकेशनं या लिहून सुकेशनं तिची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर आपले लिक झालेले फोटो म्हणजे आपल्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ केल्याचा आरोपही त्यानं केला आहे. महाठग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुकेश चंद्रशेखरनं त्याच्या वकिलांमार्फत माध्यमांना एक पत्र लिहीलं आहे. या पत्रामधून त्यानं आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘माझे अत्यंत खासगी फोटो अशा प्रकारे व्हायरल झालेले पाहून मला खूप वाईट वाटतंय. गेल्या आठवड्यात बातम्यांमधून मला हे सगळं समजलं. एखाद्या व्यक्तीच्या खासगी आयुष्यावर घातलेला हा घाला आहे. कोणाच्याही खासगी आयुष्यात ढवळाढवळ केली जाऊ नये याचं उल्लंघन आहे. कृपया जॅकलीनची प्रतिमा खराब करु नका अशी विनंती मी तुम्हा सगळ्यांना करत आहे. हे सहन करणं तिच्यासाठी खूप कठीण आहे ,’ असं सुकेशनं या पत्रात लिहीलं आहे. हे वाचा- ‘रंगीला गर्ल’ने दिले अनेक हिट चित्रपट, पण तरीही लागला होता फिल्म करिअरला ब्रेक सुकेशनं (Sukesh Chandrasekhar) या चिठ्ठीत पुढे लिहीलं आहे, ‘मी याआधीही सांगितलं आहे की मी आणि जॅकलीन रिलेशनशीपमध्ये होतो. आम्ही एकमेकांना डेट करत होतो. आमचं हे नातं कोणत्याही प्रकारे पैशांवर, फायद्यांवर अवलंबून नव्हतं. आम्हाला सतत ट्रोल केलं जातं आहे, कमेंट्स केल्या जात आहेत. पण तिनं माझ्यावर निस्वार्थी प्रेम केलं. आमच्या नात्यात एकमेकांबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर होता. माझ्यासाठी जॅकलीनपेक्षा योग्य दुसरी कोणी नव्हती हे मी आधीही संगितलं आहे. याचा मनी लाँड्रिंगच्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.’ जॅकलीन आणि तिच्या कुटुंबीयांना दिलेल्या महागड्या गिफ्ट्सबद्दलही या पत्रात सुकेशनं उल्लेख केला आहे. ‘मी जॅकलीन किंवा तिच्या कुटुंबीयांना ज्या भेटवस्तू दिल्या आहेत त्या तर कोणीही प्रेमी आपल्या प्रेयसीला देऊ शकतो. त्या अगदी नॉर्मल गोष्टी आहेत. ही गोष्ट इतकी मोठी करण्याची काय गरज आहे हे मला समजत नाही. या वस्तू माझ्या योग्य पद्धतीने केलेल्या स्वकमाईच्या पैशाच्या आहेत आणि लवकरच मी हे कोर्टातही सिद्ध करेन’. सुकेश चंद्रशेखरनं जॅकलिन फर्नांडिसला 56 लाखांचा घोडा, 36 लाखांच्या चार मांजरी अशांसारखी अनेक महागडी गिफ्ट्स दिली आहेत. हे वाचा- जय-मीरानंतर आता बिग बॉसची ही स्पर्धक झळकणार उत्कर्ष शिंदेच्या गाण्यात ‘मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो ती जॅकलीनबद्दल गैरसमज करून घेऊ नका. तिला प्रेम आणि पाठिंबा देत राहा. तिनं काहीही चुकीचं केलेलं नाही. फक्त निरपेक्ष प्रेम मात्र केलं आहे’, असं भावनिक आवाहनही सुकेशनं आपल्या या चिठ्ठीत शेवटी केलं आहे. तर सुकेशबरोबरचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आपल्याला या देशातील लोकांनी नेहमीच प्रेम दिलं आहे. मीडियानंही मला नेहमी पाठिंबा दिला आहे. या माझ्या कठीण काळात मला पाठिंबा द्यावा, माझ्याबद्दल गैरसमज करु नयेत अशी विनंती जॅकलिननं मीडियाला केली होती. जॅकलीन-सुकेशचा एक किस करतानचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर जॅकलीन बरीच ट्रोल झाली होती. सुकेशबरोबरच्या रिलेशनशीपमुळे जॅकलिनच्या करिअरला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. तिला सुपरस्टार नागार्जुनाच्या ‘द घोस्ट’ मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या