JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / कॉन्ट्रोव्हर्सी गर्ल श्री रेड्डीने केले सचिन तेंडुलकरवर गंभीर आरोप

कॉन्ट्रोव्हर्सी गर्ल श्री रेड्डीने केले सचिन तेंडुलकरवर गंभीर आरोप

सचिन तेंडुलकर हैदराबादमध्ये आला होता. तेव्हा तो एका ‘चार्मिग गर्ल’ला भेटला…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदराबाद, १२ सप्टेंबर- कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अभिनेत्री श्री रेड्डीचं नाव अग्रणी आहे. वाद आणि श्री रेड्डी याजणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कास्टिंग काऊचच्याविरोधात भर रस्त्यात कपडे उतरवणाऱ्या श्रीने आता चक्क सचिन तेंडुलकरवर खळबळजनक आरोप केला आहे. श्रीने सचिनचे दाक्षिणात्य अभिनेत्री चार्मी कौरसोबत नाव जोडले आहे. फेसबुक पोस्ट लिहिताना श्रीने लिहिले की, ‘सचिन तेंडुलकर हैदराबादमध्ये आला होता. तेव्हा तो एका ‘चार्मिग गर्ल’ला भेटला. हाय प्रोफाइल चामुडेश्वर स्वामी हे मध्यस्थ होते. एक महान व्यक्तिमत्त्व चांगला खेळ खेळू शकतात.. म्हणजे चांगला रोमान्स करु शकतात.’ श्रीच्या या पोस्टवर तिने ज्या चार्मिंग गर्लचा उल्लेख केला ती दाक्षिणात्य अभिनेत्री चार्मी कौर असल्याचे म्हटले जात आहे. श्रीच्या या स्टेटमेंटवर सचिन आणि चार्मी या दोघांनीही अजून प्रतिक्रिया दिली नाही. श्रीच्या या पोस्टचा अनेकांनीच समाचार घेतला. क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिनबद्दल असं कसं बोलू शकतेस असा प्रश्न तिला विचारण्यात आला. श्री रेड्डीने यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींवर खळबळजनक आरोप केले आहेत. कास्टिंग काऊचप्रकरणात भर रस्त्यात कपडे काढून तिने याचा निषेध केला होता. या प्रकरणापासूनच तिला ओळख मिळाली. सुपरस्टार पवन कल्याण, नानी, अभिराम दग्गूबती यांवर कास्टिंग काऊचचा गंभीर आरोप केला होता.

सावधान- आधार कार्डचं सॉफ्टवेअर झालंय हॅक, कोणीही बदलू शकतं तुमचं नाव आणि पत्ता घरबसल्या असा बदला आधार कार्डवरील फोन नंबर आणि पत्ता

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या