JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / गांगुलीची ‘दादागिरी’, बुमराहसाठी बदलला क्रिकेटमधला सर्वात महत्त्वाचा नियम

गांगुलीची ‘दादागिरी’, बुमराहसाठी बदलला क्रिकेटमधला सर्वात महत्त्वाचा नियम

बीसीसीआयच्या अध्यक्षांनी बदलला क्रिकेटचा नियम, वाचा काय आहे प्रकरण.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 डिसेंबर : एकीकडे रणजी करंडक सुरू झाला असताना दुसरीकडे भारतीय संघातील खेळाडू या स्पर्धेत सामिल झाले आहे. मात्र गुजरातविरुद्ध केरळ यांच्यातील सुरू असलेल्या सामन्यात एक वादग्रस्त प्रकार घडला. या सामन्यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे या सामन्यात दुखापतीतून परतलेला गोलंदाजही जसप्रीत बुमराह खेळणार होता, पण शेवटच्या क्षणी तो या सामन्यातून माघार घेतली. वृत्तानुसार, बुमराह दुखापतीतून परतला असून श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 सामन्यात त्याची निवडही करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी श्रीलंकादौऱ्याआधी बुमराह कोणतीही स्पर्धा खेळणार नाही आहे. हा निर्णय बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यानं घेतला आहे. पुनरागमनानंतर त्याने आणखी गोलंदाजी करावी अशी आपली इच्छा नाही, असे त्यांनी सौरव गांगुलीला सांगितले. त्यानंतर बीसीसीआयच्या अध्यक्षांनी बुमराहसाठीचे नियम बदलले व त्याला विश्रांती घेण्यास परवानगी दिली. वाचा- दंगल गर्ल गीता फोगट झाली आई, शेअर केला PHOTO बुमराह रणजी सामन्यात खेळला नाही टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह केरळविरुद्ध रणजी सामना खेळण्यास तयार होता. मात्र गोलंदाजी करून त्याच्या शरीरावर आणखी ताण येईल, त्यामुळं त्यानं माघार घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर बुमराह यांनी गांगुली आणि बीसीसीआय सचिव जय शहा यांच्याशी बोललो, त्यानंतर दोघांनी बुमराहला पांढर्‍या बॉलने खेळण्याचा सल्ला दिला. याचाच अर्थ बुमराह आता थेट श्रीलंकेविरुद्धच्या टी -20 सामन्यात खेळेल. वाचा- बुमराहला रणजी ट्रॉफीत खेळता येणार पण निवड समितीची अट असा आहे बीसीसीआयचा नियम बीसीसीआयचा असा नियम आहे की जो कोणी दुखापतीनंतर परत येतो तेव्हा त्याने सामना खेळून आपली फिटनेस सिद्ध करावी लागेते आणि त्यानंतरच तो भारतीय संघातील प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकेल. तथापि, या प्रकरणात गांगुलीने बुमराहला माफ केले आहे. त्यामुळं बुमराह थेट आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकतो. वाचा- IPLच्या तारखेनं उडवली आठही संघांची झोप, दिग्गज खेळाडू घेणार माघार? गुजरात संघालाही बुमराह संघात नको होता! वृत्तानुसार, बुमराहकडून दिवसाला 8 षटकांपेक्षा जास्त षटके न टाकण्याची कबुल करून घेण्यात आले होते. त्यामुळं गुजरात संघाला केवळ 8 ते 10 षटके गोलंदाजी करणारा खेळाडू नको होता. अखेर गांगुलीने बुमराहला विश्रांती दिली आणि आता बुमराह जानेवारीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या क्रिकेट मैदानावर परतणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या