मुंबई, 01 जून : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने काही वेळापूर्वी एक ट्वीट केलं, या ट्वीटमुळे त्याने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या, पण गोंधळ वाढल्यानंतर बीसीसीआय सचिव जय शाह यांनी मात्र सौरव गांगुलीने राजीनामा दिला नसल्याचं स्पष्ट केलं. ऑक्टोबर 2019 मध्ये गांगुली यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यापूर्वी तो बंगाल क्रिकेट असोसिएशनचा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होता.
दरम्यान, विराट कोहलीनं एकापाठोपाठ इंडियन क्रिकेट टीमच्या तिन्ही फॉरमॅटमधील कॅप्टन्सी सोडली. त्याच्या या अनपेक्षित निर्णयाला बीसीसीआय चीफ सौरव गांगुली आणि बीसीसीआय सेक्रेटरी जय शाह यांना जबाबदार धरले जात आहे. दोघांनाही सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आलं आहे. परिणामी, आता लवकरच त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागेल अशी शक्यता वर्तवली जात होती. नियमाप्रमाणं सौरभ गांगुली आणि जय शहा यांचा कार्यकाळ जुलै आणि ऑगस्ट 2018 मध्ये संपणार होता. त्यापूर्वीच दोघांनीही कार्यकाळ वाढवण्यासाठी सुप्रीम कार्टात दाद मागितली होती. बीसीसीआयच्या नवीन संविधानानुसार, स्टेट क्रिकेट अथॉरिटी (State Cricket Authority) किंवा बीसीसीआयमध्ये सहा वर्षांच्या कार्यकाळानंतर तीन वर्षांच्या कूलिंग-ऑफ पिरियडवर (Cooling-off period) जाणं बंधनकारक आहे. गांगुली आणि शाह यांनी ऑक्टोबर 2019 मध्ये पदभार स्वीकारला. त्यापूर्वी गांगुली पश्चिम बंगालमध्ये तर जय शाह दिल्ली क्रिकेट असोसिएशनमध्ये कार्यरत होते. बीसीसीआयमध्ये नियुक्ती झाली तेव्हा स्टेट आणि नॅशनल युनिटमधील त्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास फक्त नऊ महिने शिल्लक होते. त्यामुळे याबाबत हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. ‘एजीएममध्ये 9 ऑगस्ट 2018 पासून लागू होणाऱ्या कुलिंग ऑफ पिरियडच्या नियमांत सुधारणा करून पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ वाढवण्यास मान्यता दिली आहे,’ या निर्णयाचा आधार घेऊन ही याचिका दाखल करण्यात आली होती.