नवी दिल्ली, 22 मार्च: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा (Sara Tendulkar) या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असतेच. मात्र, सध्या ती एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी ती गोव्यात सुट्टीसाठी गेली होती त्यावेळी ती एका खास व्यक्तिसोबत दिसली होती. आताही त्याच व्यक्तीसोबत लंडनमध्ये दिसली आहे. सध्या तिच्या एका पोस्टमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. गोव्यात सुट्टीवर असताना ती एका खास व्यक्तिसोबत दिसली होती आणि तिच व्यक्ती आता लंडनमध्येही सारासोबत दिसली आहे. साराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्या व्यक्तिसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. साराने नुकतांच शेअर केलेल्या फोटोमध्ये सारा जीपच्या फ्रंट सीटवरील दरवाज्यावर उभी असलेली दिसली होती आणि ती खास व्यक्ती सेल्फी घेताना दिसत आहे.
दोघे पुन्हा एकत्र दिसल्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. सिद्धार्थ केरकर असे या व्यक्तीचे नाव आहे. 17 नोव्हेंबर 2021 मध्ये या व्यक्तिचं नाव चर्चेत आले होते. त्यावेळी साराने तिच्यासोबत इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केला होता. सारा सध्या लंडनमध्ये आहे आणि तिने शनिवारी इंस्टा स्टोरीवर मैत्रीण मार्टिना व सिद्धार्थ यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला.
कोण आहे सिद्धार्थ सिद्धार्थ केरकर हा इंस्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहे. त्याचे जवळपास 85 हजार फॉलोअर्स आहेत. तो एक आर्टिस्ट आहे आणि तो पेटिंग्स बनवतो.