शेन वॉर्नच्या आठवणीत सचिन झाला भावुक, शेअर केला खास फोटो
मुंबई, 4 मार्च : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटर शेन वॉर्न याची आज पहिली पुण्यतिथी आहे. 4 मार्च 2022 रोजी वयाच्या 52 व्यावर्षी त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. अशातच भारताचा माजी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर शेन वॉर्नच्या आठवणीत भावुक झाला. त्याने सोशल मीडियावर दोघांचा एक फोटो शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. शेन वॉर्न हा सर्वकाळातील एक महान लेग-स्पिनर होता, ज्याते ऑस्ट्रेलियाकडून खेळताना कसोटी सामन्यात तब्बल 708 बळी घेतले होते. त्याने 293 वन-डे आंतरराष्ट्रीय विकेट्स देखील घेतल्या आणि ऑस्ट्रेलियासाठी सर्व फॉरमॅटमध्ये 300 हून अधिक सामने खेळले. 1992 ते 2007 या 15 वर्षांच्या कारकिर्दीत शेन वॉर्नने अतुलनीय केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, वॉर्नने आयपीएल संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक उत्तम कामगिरी एली त्याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. Mumbai : महिलांना WPL मध्ये मोफत प्रवेश, मात्र ही प्रक्रिया करावी लागेल फॉओ; अन्यथा…
सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न यांच्यात खास मैत्री होती. सचिनने आज शेन वॉर्नच्या पहिल्या पुण्यतिथी निमित्त खास फोटो शेअर केला. याला सचिनने कॅप्शन देत लिहिले, “आम्ही मैदानावर काही संस्मरणीय सामने खेळले आहेत आणि तितकेच संस्मरणीय क्षण अनुभवले आहेत. मला तुझी आठवण फक्त एक महान क्रिकेटर म्हणून नाही तर एक चांगला मित्र म्हणूनही आहे. मला खात्री आहे की तू तुझ्या विनोदबुद्धीने आणि करिष्माने स्वर्गाला पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक स्थान बनवत असशील, वॉर्नी!