JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सचिन तेंडुलकर, उद्धव ठाकरे आणि 315, दोन्ही मुंबईकरांचं या नंबरशी आहे खास कनेक्शन

सचिन तेंडुलकर, उद्धव ठाकरे आणि 315, दोन्ही मुंबईकरांचं या नंबरशी आहे खास कनेक्शन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), या दोन्ही मुंबईकरांचं 315 या क्रमांकाशी खास कनेक्शन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना यावर भाष्य केलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), या दोन्ही मुंबईकरांचं 315 या क्रमांकाशी खास कनेक्शन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना यावर भाष्य केलं. मुंबईत राहून बेस्ट बसने प्रवास न केलेला कदाचित एकही मुंबईकर नसेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या प्रवासाची अशीच एक आठवण सांगितली. मी 315 आणि 316 क्रमांकाच्या बसने प्रवास करायचो, 87 बसनेही जायचो, पण 87 क्रमांकाच्या बसमधून उतरल्यावर मंत्रालयाकडे बघयचो नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. काहीच दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर यानेही 315 क्रमांकाच्या बसची एक आठवण सांगितली. सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट शेयर केली. या फोटोंमध्ये सचिन 315 क्रमांकाच्या बसमध्ये बसला आहे. सचिन आणि उद्धव ठाकरे हे दोघं वांद्र्यामध्येच लहानाचे मोठे झाले. 315 क्रमांकाची बस वांद्र्यामधून शिवाजी पार्कला जाते, सचिन आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं वांद्रे आणि शिवाजी पार्कशीही भावनिक नातं आहे.

‘अनेक वर्षांनी मी 315 क्रमांकाची बस बघितली आहे. ही बस वांद्रे आणि शिवाजी पार्क दरम्यान चालते. मी या बसमधून प्रवास करायचो आणि शिवाजी पार्कला उतरून अभ्यासाला सुरूवात करण्यासाठी उत्सुक असायचो. सराव आणि बऱ्याच मॅच खेळल्यानंतर जेव्हा मी थकायचो तेव्हा माझी आवडती सिट मिळेल, एवढीच माझी अपेक्षा असायची,’ असं सचिन या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे.

‘बसमध्ये जाऊन मी शेवटच्या सीटवर बसायचो, या सीटवर थंड हवा यायची. दमलेलो असल्यामुळे मला बरेच वेळा झोपही लागायची. झोप लागल्यामुळे कित्येकदा स्टॉपच्या पुढेही जायचो, पण हे दिवस खूपच चांगले होते,’ असं सचिनने सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या