मॉस्को, 13 ऑगस्ट : वेटलिफ्टिंग हा असा खेळ आहे, जिथे किती किलोचे वजन उचलले जाते. मात्र याचा त्रास कधीकधी खेळाडूंना होतो. असाच एक भयंकर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रशियाचा प्रसिद्ध वेटलिफ्टर अलेक्झांडर सेदीखनं 400 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्याच्यासोबत भयंकर अपघात झाला. वजन उचलत असताना त्याचा तोल गेला आणि त्याचे गुडघ्याच्या वाट्या सरकल्या. या अपघाचा भयंकर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये द वर्ल्ड रॉ पॉवर लिफ्टिंग फेडरेशन युरोपियन चॅम्पियनशीप स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 400 किलो वजन उचलने बंधनकारक होते. या स्पर्धेत अलेक्झांडरनेही भाग घेतला होता. मात्र वचन उचलल्यानंतर त्याचा तोल गेला आणि त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. याचा व्हिडीओ 12 ऑगस्ट रोजी YouTube वर पोस्ट करण्यात आला आहे. वाचा- बुडत्याला जेसीबीचा आधार, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO
वाचा- 6 दिवसांच्या बाळाला आयानं खेळण्यासारखं फेकलं, धक्कादायक CCTV VIDEO आला समोर या व्हिडीओमध्ये वेटलिफ्टिंगसाठी अलेक्झांडर स्टेजवर आल्याचे दिसत आहे. त्यावेळी त्यानं खांद्यावर 400 किलोचे वजन घेतले, मात्र त्याचा तोल गेला. 4 लोकांनी वजन पकडूनही अलेक्झांडर जमिनिवर आदळला. कोणताही अनुसुचित प्रकार घडला नसला तरी, अलेक्झांडरचा गुडघा फ्रॅक्चर झाला आहे. वाचा- धक्कादायक! चॅलेंज स्वीकारत तरुणाने चक्क गुप्तांगालाच लावली आग; LIVE VIDEO VIRAL या अपघातानंतर तातडीने अलेक्झांडरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर 6 तास शस्त्रक्रिया करण्यात आली. आता अलेक्झांडरला पुन्हा वेटलिफ्टिंग करण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. य़ा अपघाताचा व्हिडीओ भितीदायक असून, काही लोक हा व्हिड़ीओ पाहूनही शकले नाहीत.