मुंबई : गेल्या एक-दोन दिवसांपासून मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माबाबत वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. संघ 2 एप्रिल रोजी बेंगळुरू येथे आरसीबी विरुद्ध मोहीम सुरू करणार आहे. त्याआधी संघाचा कर्णधार कुठे आहे? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असेल. रोहित शर्माबद्दल येत असलेल्या बातम्यांमुळे चाहत्यांचे टेन्शन वाढलं आहे. गुरुवारी IPL 2023 च्या सर्व कर्णधारांचे फोटोशूट झाले. आयपीएल 16 मध्ये 10 संघ खेळत आहेत पण फोटोशूटमध्ये 10 ऐवजी फक्त 9 कॅप्टन्स होते.
या फोटोतून मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा गायब होता. हा फोटो समोर येताच सोशल मीडियावर मुंबई इंडियन्स आणि हिटमॅनच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सर्वत्र एकच प्रश्न होता, रोहित शर्मा कुठे आहे? प्रत्येकजण आपल्या आवडत्या खेळाडूचे अपडेट मिळविण्यासाठी उत्सुक होता.
Virat Kohli SSC Marksheet : आयपीएलपूर्वी विराटने शेअर केली दहावीची मार्कशीट! या विषयात होते सर्वात कमी मार्करोहित शर्मा या फोटोमध्ये न दिल्याने चाहत्यांची चिंताही वाढली आणि काहींनी त्याला ट्रोल देखील केलं आहे. रोहित शर्मा आयपीएलचे पहिले काही सामने खेळणार नाही अशी माहिती मॅनेजमेंटकडून देण्यात आली होती. रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार आहे आणि IPL नंतर त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक यासारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये संघाची धुरा सांभाळायची आहे. अशा स्थितीत त्यांच्या कामाचा ताण सांभाळणे बंधनकारक आहे. रोहित सुरुवातीच्या सामन्यांमध्ये संघाबाहेर राहू शकतो अशी चर्चा आहे.