या यादीत भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माचे नावही आघाडीवर आहे. टी-20मध्ये रोहितनं तीन शतक लगावले आहेत. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक लगावण्याची कामगिरी रोहितनं एकदा नाही तर दोनदा केली आहे. त्यामुळं अशी कमाल तो टी-20मध्येही करू शकतो.
कटक,22 डिसेंबर : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मानं वेस्ट इंडिजविरुद्ध कटक वन डे सामन्यात 9 धावा केल्यामुळे सनथ जयसूर्याचा 22 वर्षांचा रेकॉर्ड मोडला. तिसर्या एकदिवसीय सामन्यात जेसन होल्डरच्या चेंडूवर षटकार खेचल्यानंतर श्रीलंकेच्या जयसूर्याच्या सलामीवीर म्हणून एका वर्षात 2 हजार 387 धावांची नोंद केली. 1997मध्ये जयसूर्यानं ही अद्भुत कामगिरी केली होती. गेल्या 22 वर्षांत कोणत्याही सलामीवीरने वर्षात इतक्या धावा केलेल्या नाहीत. याचबरोबर या सामन्यात रोहितनं 52 चेंडूत आपले अर्धशतकी पूर्ण केले. रोहितनं 7 चौकार मारत ही कामगिरी केली. याआधी रोहितनं दुसऱ्या सामन्यात 159 धावांची खेळी केली होती. कटक एकदिवसीय सामन्यापूर्वी रोहितच्या नाव 2 हजार 379 धावा होत्या. कटक वन डेमध्ये रोहितने चौकारांसह आपले खाते उघडले. त्याने शेल्डन कॉटरेलची पहिली ओव्हर काळजीपूर्वक खेळला आणि एकही धाव काढली नाही. पण यानंतर त्याने आपल्या दुसर्या षटकातील पहिल्या चेंडूवर 4 धावा केल्या. रोहितला दोन चेंडूंत पुन्हा चौकार मिळाला. जेसन होल्डरच्या ओव्हरमध्ये षटकार मारत त्याने जयसूर्याचा 2387 धावांचा विक्रम मागे टाकला. वाचा- मुंबई इंडियन्सचे पैसे वसुल! IPLआधीच ‘या’ खेळाडूनं केल्या 35 चेंडूत 94 धावा
वाचा- पंत पुढे खेळाडूंनी टेकले हात! सलग तीन कॅच सोडण्याची लाजीरवाणी कामगिरी रोहित शर्मा यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी विश्वचषकात त्याने केवळ पाच शतके ठोकली नाहीत तर त्याची बॅटही कसोटी क्रिकेटमध्ये पेटली आहे. यावर्षी कसोटी क्रिकेटमध्येही त्याने द्विशतक झळकावले. टी -20 क्रिकेटमध्येही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसह सर्वाधिक धावा करणारा फलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे अव्वल स्थान आहे. वाचा- कधी 200 रुपयांसाठी केली गोलंदाजी आता टीम इंडियात केलं पदार्पण!
त्याचबरोबर भारताला ही मालिक जिंकण्यासाठी 316 धावांची गरज आहे. यासाठी केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी चांगली सुरुवात करत शतकी भागीदारीही केली आहे. भारतानं टॉस जिंकत या सामन्यात गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय टीम इंडियाच्या फळास आला नाही. पहिले 15 ओव्हर भारताला एकही विकट मिळवता आली नाही. सलामीवीर एविन लुईस आणि शाई होप यांनी अर्धशतकी भागिदारी केली. अखेर रवींद्र जडेजानं ही जोडी फोडली. मात्र या सामन्यातही क्षेत्ररक्षणात भारतीय संघानं निराशाजनक कामगिरी केली. यात पंतनं एक-दोन नाही तर तब्बल तीन झेल सोडल्या. याचा फटका टीम इंडियाला बसला.