दुबई, 26 सप्टेंबर : दुबईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या (ipl 2021) दुसऱ्या हंगामामध्ये मुंबई इंडियन्स (mumbai indians) आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरूमध्ये (royal challengers bangalore) सामना रंगला. मुंबई इंडियन्सने (mi) चांगली पकड मिळवली होती. पण, हर्षल पटेलनं (harshal patel) भलेमोठे खिंडार पाडले. हर्षलने हॅट्रटिक साधून नवा रेकॉर्ड केला आहे. मुंबईविरुद्ध त्याने 4 विकेट्स मिळवल्या. मुंबईत इंडियन्सने 165 धावांचा पाठलाग केला खरा पण, 111 धावांवर संपूर्ण टीम बाद झाली आहे. रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. रोहितने सर्वाधिक 43 रन्स केले. तर क्विंटन डी कॉक 24 रन्स केले आहे. विशेष म्हणजे, रोहित आणि क्वि्टनने दमदार सुरुवात केली होती. पण, क्विटन 23 रन्स करून आऊट झाला. त्यावेळी स्कोअर हा 57 इतका होता. त्यानंतर 72 धावांवर रोहित शर्माही 43 रन्स करून आऊट झाला. सलामीची जोडी माघारी परतल्यामुळे ईशान किशन, सुर्यकुमार यादव, पोलार्ड, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्यावर जबाबदारी येऊन पडली होती. पण, हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल आणि युजवेंद्र चहलने मुंबई इंडियन्सच्या बॅटिंगची पुरती वाट लावून टाकली.
चहलने ईशान किसनला ९ रन्सवर माघारी पाठवले त मोहम्मद सिराजने सुर्यप्रसादला ८ रन्सवर आऊट केलं. त्यानंतर मुंबईत इंडियन्स डाव पत्ताच्या बंगल्या प्रमाणे कोसळला. एक एक खेळाडू मैदानाचे दर्शन करून लगेच माघारी परतला. हर्षल पटेलने एकाच ओव्हरमध्ये पोलार्ड, हार्दिक पांड्या आणि मिलनला आऊट करून हॅट्रटिक साधली. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा खेळ खल्लास झाला. अवघा संघ 111 धावांवर गारद झाला.
त्याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीने मुंबईसमोर 166 धावांचे लक्ष्य ठेवले. सलग दुसऱ्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीनं शानदार अर्धशतक झळकावलं, त्यानं 42 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 51 धावा केल्या. मधल्या फळीतील फलंदाज ग्लेन मॅक्सवेलनेही उत्कृष्ठ फलंदाजी करत 37 चेंडूत 56 धावा चोपल्या. यामध्ये 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. तर मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 गडी बाद केले. त्यानं शेवटच्या षटकांमध्ये आरसीबीला जास्त धावा काढण्यापासून रोखून धरले. त्याच्याशिवाय बोल्ट, चाहर आणि अॅडम मिलने यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.