आयपीएलच्या 12 हंगामात आतापर्यंत एकूण 54 शतक लगावले आहेत. यात सर्वात जास्त शतक लगावण्याचा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या नावावर आहे.
बंगळुरू, 26 डिसेंबर : इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) तेराव्या हंगामासाठी काही दिवसांपूर्वी लिलाव झाला. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज पॅट कमिन्सला (Pat Cummins) 15.50 कोटींना सर्वात विक्रमी किमतीला विकत घेतले. त्यानंतर पंजाब संघानं ग्लेन मॅक्सवेलवर 10.75 कोटींची बोली लागली. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (Royal Challengers Bengalore) ने 10 कोटींना दक्षिण आफ्रिकेचा जलद गोलंदाज ख्रिस मॉरिसला विकत घेतले. मात्र विराट कोहली एका खेळाडूवर पैसे लावण्यासाठी तयार होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बंगळुरू संघानं गेल्या हंगामात निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळं या लिलावात त्यांनी मोक्याच्या खेळाडूंना संघात सामिल केले. मात्र आता बंगळुरू संघाचा प्रशिक्षक माईक हेसननं आयपीएलच्या लिलावाबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. वाचा- कॅप्टन कोहलीची शानदार कामगिरी! दशकातल्या टॉप-5 खेळाडूंमध्ये मिळवले स्थान माईक हेसनला या खेळाडूवर लावायची होती बोली आयपीएलच्या तेराव्या हंगामात बंगळुरू संघानं लिलावात इसुरु उदानाला (Isuru Udana) 50 लाखांना घेतले होते. मात्र आता प्रशिक्षक माईक हेसननं एक धक्कादायक खुलासा केला आहे. माइक हेसननं या व्हिडीओमध्ये इसुरु उदानासाठी संघाकडे जेवढे पैसे आहेत, तेवढे सर्व लावण्यासाठी सज्ज होता. लिलावासाठी बंगळुरू संघाकडे 27.90 कोटी होते. आयपीएलच्या लिलावापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये माईक हेसन टीम मॅनेजमेंट उडानाची खासियत सांगताना दिसत आहेत. ते सांगत आहेत की उडानाच्या गोलंदाजीत बरीच विविधता आहे आणि तो फलंदाजीद्वारेही उपयुक्त योगदान देण्यास सक्षम आहे. व्हिडिओमध्ये हेसन म्हणाले की, “इसुरु उदानाला संघात समाविष्ट केले तर छान होईल, परंतु असे करणे सोपे होणार नाही कारण आशा आहे की इतर फ्रँचायझीदेखील त्याच्यासाठी मोठी बोली लावतील.” आरसीबीने या तयारीचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून असे म्हटले आहे की जर आम्हाला ख्रिस मॉरिस मिळाला नाही तर आम्ही उडानासाठी सर्व काही पणाला लावण्यास तयार आहोत. वाचा- VIDEO : 130 किमी वेगानं आला चेंडू, फलंदाज जमिनीवर आणि स्टम्प हवेत!
वाचा- विराट आणि शास्त्रींमुळे संपणार होते मुंबईकर खेळाडूचे करिअर, धक्कादायक खुलासा आठ खेळाडूंनी 21.50 कोटी रुपयांना खरेदी केली आरसीबीने इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावाची त्यांची योजना कशी आखली याचा एक व्हिडिओ जारी केला आहे. आरसीबीची टीम मोठ्या स्टार्सनी परिपूर्ण आहे, परंतु अद्याप या पदव्या नावे नोंदविण्यात संघ सक्षम होऊ शकला नाही. न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माइक हेसन हे आरसीबीचे संचालक आहेत तर ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज सायमन कॅटिच हे मुख्य प्रशिक्षक आहेत. आरसीबीच्या पथकाने यावेळी लिलावात एकूण आठ खेळाडूंना 21 कोटी 50 लाख रुपयांमध्ये विकत घेतले. त्यापैकी सर्वात जास्त चर्चा श्रीलंकेचा अष्टपैलू इसुरु उदाना आहे ज्याने अलीकडच्या काळात टी -20 क्रिकेटमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. वाचा- मुंबई इंडियन्स संघाला झटका, IPLआधीच ‘या’ खेळाडूची गोलंदाजी शैली ठरली आक्षेपार्ह! जखमी खेळाडूला केले नव्हते बाद दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणार्या मॅझन्सी सुपर लीगच्या सामन्यातही हेच पाहायला मिळालं. श्रीलंकेचा गोलंदाज ईसुरु उदाना यानं हातात चेंडू असूनही फलंदाजाला बाद केले नाही. पर्ल रॉक्स आणि नेल्सन मंडेला बे जायंट्स यांच्यातील सामन्यादरम्यान ही घटना उघडकीस आली.