JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ranji Trophy: LIVE सामन्यात घुसले 2 साप, थोडक्यात वाचला अजिंक्य रहाणे; PHOTO VIRAL

Ranji Trophy: LIVE सामन्यात घुसले 2 साप, थोडक्यात वाचला अजिंक्य रहाणे; PHOTO VIRAL

रणजी करंडक स्पर्धेत यजमान मुंबई आणि कर्नाटक यांच्यात झालेल्या सामन्यात एक धक्कादायक प्रकार घडला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 डिसेंबर : रणजी करंडक स्पर्धेत यजमान मुंबई आणि कर्नाटक यांच्यात झालेल्या सामन्यात एक धक्कादायक प्रकार घडला. सामना सुरू असताना स्टेडियममध्ये साप येऊ लागल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. अजिंक्य रहाणे फिल्डिंग करत असतानाच त्याच्या शेजारी दोन साप आले. सापांना बाहेर काढण्यासाठी अखेर मदत बोलवण्यात आली. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानात हा प्रकार घडला. वाचा- अश्विनचा रेकॉर्ड तोडण्यासाठी भिडणार बुमराह आणि चहल, कोण मारणार बाजी? तीन दिवस चाललेल्या या सामन्यात कर्नाटकने एक दिवसआधीच सामना संपविला आणि पाच विकेट्स राखून विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना यजमान मुंबईला पहिल्या डावात 194 आणि दुसऱ्या डावाच 149 धावा करता आल्या. प्रत्युत्तरादाखल कर्नाटकने दुसर्‍या डावात पाच विकेट गमावून 129 धावा करून सामना जिंकला. कर्नाटक संघाने पहिल्या डावात 218 धावा केल्या होत्या. वाचा- श्रीलंकाविरुद्ध भारतीय संघात होणार 3 मोठे बदल! या खेळाडूंना मिळणार जागा

वाचा- एका सिक्ससाठी क्रिकेटपटू देणार 18 हजार! ‘हे’ आहे कारण शॉ आणि रहाणे केले निराश मुंबई संघाकडून पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे सारखे फलंदाज उतरले होते, मात्र दोघांनीही निराश केले. पहिल्या डावात शॉला 29 धावा करता आल्या, तर दुसर्‍या डावात दुखापतीमुळे तो माघारी परतला. तर रहाणेला पहिल्या डावात सात धावा करता आल्या आणि दुसऱ्या डावात फक्त एक धाव करत बाद झाला. मुंबईच्या वतीने सूर्य कुमार यादव आणि सरफराज खान यांना दोन्ही डावात चांगली फलंदाजी केली. पहिल्या डावात सूर्य कुमारनं सर्वाधिक 77 धावा केल्या तर सरफराजने दुसर्‍या डावात सर्वाधिक नाबाद 71 धावा केल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या