JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'आशिष नेहरा तर ब्रिटनच्या पंतप्रधान पदाची तयारी करतोय', वाचा का दिलं सेहवागनं खोचक उत्तर

'आशिष नेहरा तर ब्रिटनच्या पंतप्रधान पदाची तयारी करतोय', वाचा का दिलं सेहवागनं खोचक उत्तर

माजी क्रिकेटपटू आशिष नेहराच्या (Ashish Nehra) नावाचा उल्लेख करणे पाकिस्तानी विश्लेषकाला चांगलंच महाग पडलंय. त्यांना वीरेंद्र सेहवागनं खोचक उत्तर देत सुनावलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 ऑगस्ट : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आशिष नेहराच्या (Ashish Nehra) नावाचा उल्लेख करणे पाकिस्तानी विश्लेषकाला चांगलंच महाग पडलंय. पाकिस्तानमधील राजकीय विश्लेषक झैद हमीद (Zaid Hamid) यांनी नेहराचा उल्लेख त्यांच्या ट्विटर हँडलवर भारतीय भालाफेकपटू असा केला होता. त्याला टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं (Virendra Sehwag) खोचक उत्तर दिलं आहे. काय आहे प्रकरण? नुकत्याच संपलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीमनं सुवर्णपदक जिंकलं. नदीमच्या सुवर्णपदकावर पाकिस्तानमध्ये आनंद व्यक्त केला जातोय. त्याचवेळी हमीद यांना या प्रकरणात ट्विट करताना भारत द्वेषाची उबळ आली. हमीद यांनी यावर ट्विट करताना पाकिस्तानी खेळाडूनं भारतीय भालाफेक स्टार आशिष नेहरा याला हरवत मागील पराभवाचा बदला घेतला असं ट्विट केलं. हमीद यांनी नेहराचा उल्लेख केल्यानं सोशल मीडियावर ते चांगलेच ट्रोल होत आहेत.

संबंधित बातम्या

जाहिरात

वीरेंद्र सेहवागनंही या प्रकरणात ट्विट करत हमीद यांना खोचक उत्तर दिलं आहे. ‘चाचा, आशिष नेहरा सध्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी होणाऱ्या निवडणुकीची तयारी करत आहे. चिल’ असं उत्तर सेहवागनं त्यांना दिलं.

जाहिरात

ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी भारतीय वंशाचे उमेदवार ऋषी सुनक सध्या रिंगणात आहे. सुनक आणि नेहरा यांच्या चेहऱ्यात साम्य असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती. त्याचा संदर्भ देत सेहवागनं हे ट्विट केलंय. सेहवागचं हे ट्विट देखील सध्या चांगलंच व्हायरल झालं आहे. रोहितच्या एका निर्णयानं सूर्यकुमारची नंबर वन होण्याची संधी हुकली, पाहा काय घडलं? पाकिस्तानी इस्लामी विचारवंत असलेले झैद हमीद हे नेहमीच  वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबचा उल्लेख हिंदू समर्थक असा केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या