JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'तालिबान्यांमधील ही सकारात्मक बाब तुम्हाला दिसलीच नाही', शाहिद आफ्रिदीनं तोडले अकलेचे तारे

'तालिबान्यांमधील ही सकारात्मक बाब तुम्हाला दिसलीच नाही', शाहिद आफ्रिदीनं तोडले अकलेचे तारे

पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीनं वादग्रस्त वक्तव्य करत आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. यावेळी त्याला तालिबान या दहशतवादी संघटनेत सकारात्मक गुण (Taliban Positive qualities) दिसले आहेत.

जाहिरात

शाहिद आफ्रिदीनं थेट तालिबानी दहशतवादी संघटनेचं कौतुक केलं आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट: पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटर शाहिद आफ्रिदी (shahid afridi) आणि वाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मागील बऱ्याच वर्षांपासून आफ्रिदी कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त वक्तव्यावरून नेहमी चर्चेत असतो. यावेळीही त्यानं वादग्रस्त वक्तव्य करत पुन्हा आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. यावेळी त्याला तालिबान या दहशतवादी संघटनेत सकारात्मक गुण (Taliban Positive qualities) दिसले आहेत. एककीडे अफगाणिस्तानच्या स्टार क्रिकेटपटूंनी तालिबान्यांच्या कृत्याचा निषेध केला असताना आफ्रिदीचं हे विधान अफगाणी क्रिकेटपटूंना धक्का देणारं आहे. यावेळी शाहिद आफ्रिदीनं थेट तालिबानी दहशतवादी संघटनेचं कौतुक (Shahid Afridi Praise Taliban) केलं आहे. यावेळी तालिबान संघटना एक नवा आणि सकारात्मक दृष्टीकोन घेऊन पुढे आली आहे. त्यांनी महिलांना काम करण्याची आणि राजकारणात सहभाग घेण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी असं चित्र पाहायला मिळालं नाही, असं आफ्रिदीनं म्हटलं आहे. एवढंच नाहीतर तालिबान क्रिकेटला देखील पाठिंबा देत असल्याचं त्यानं म्हटलं आहे. श्रीलंकेतील परिस्थितीमुळे मालिका होऊ शकली नाही. पण तालिबान क्रिकेटला पूर्णपणे पाठिंबा देत असल्याचं वक्तव्य आफ्रिदीनं केलं आहे.

संबंधित बातम्या

हेही वाचा- डच्चू मिळाल्यावर लष्करात दाखल, दिग्गज क्रिकेटपटूची पुन्हा टीममध्ये एण्ट्री आफ्रिदीचं हे वक्तव्य समोर आल्यानंतर अनेक क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियात आफ्रिदीवर टीकेची झोड उठवली आहे. विशेष म्हणजे अफगाण क्रिकेट संघातील स्टार खेळाडू राशिद खान आणि मोहम्मद नबी यांनी तालिबानच्या कृत्याचा निषेध केला आहे. काही दिवसांपूर्वी देशात उफाळलेलं अराजक पाहून राशिद खाननं जगाकडे मदतीसाठी याचना देखील केली होती. असं असताना आफ्रिदीचं हे वक्तव्य अनेक अफगाण नागरिकांसह क्रिकेट चाहत्यांसाठी चिड आणणार आहे. हेही वाचा- …तर टीम इंडियावर येईल मोठं संकट;कोहलीचा Fan असणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटरची खंत अमेरिकेनं अफगाणिस्तानातून आपलं सैन्य माघारी घेतल्यानंतर, तालिबान दहशतवादी संघटनेनं बंदुकीच्या जोरावर संपूर्ण देशावर ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर देशात सर्वत्र अराजक पसरलं आहे. अनेक नागरिकांनी आपला जीव मुठित घेऊन पलायन करायला सुरुवात केली आहे. यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा हकनाक बळी गेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या