JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : लखनऊने केएल राहुलसह 'या' दोघांची केली निवड, मोजले इतके रुपये

IPL 2022 : लखनऊने केएल राहुलसह 'या' दोघांची केली निवड, मोजले इतके रुपये

आयपीएल 2022 (IPL 2022) चा मेगा लिलाव फेब्रुवारी महिन्यात12 आणि 13 तारखेला होणार आहे. तत्पूर्वी, अहमदाबाद नंतर लखनऊ संघानेदेखील आपल्या तीन खेळाडूंची निवड केली आहे. लखनऊने केएल राहुल (KL Rahul), मार्कस स्टॉइनिस आणि रवी बिश्नोई यांची निवड केली आहे.

जाहिरात

KL Rahul

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 जानेवारी: आयपीएल 2022  (IPL 2022) चा मेगा लिलाव फेब्रुवारी महिन्यात12 आणि 13 तारखेला होणार आहे. पुढच्या हंगामात आठ ऐवजी दहा संघ मैदानात उतरणार आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन फ्रेंचायझी स्पर्धेत सामील होणार आहेत. मेगा लिलावापूर्वी सर्व संघांना चार खेळाडूंना संघात रिटेन करण्याची परवानगी मिळाली होती. या दोन नवीन फ्रेंचायझींना देखील तीन खेळाडू निवडता येणार आहेत.  दरम्यान, अहमदाबाद नंतर लखनऊ संघानेदेखील आपल्या तीन खेळाडूंची निवड केली आहे. लखनऊने केएल राहुल (KL Rahul), मार्कस स्टॉइनिस ( Marcus Stoinis) आणि रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) यांची निवड केली आहे. केएल राहुल (KL Rahul), मार्कस स्टॉइनिस आणि रवी बिश्नोई हे पुढच्या हंगामात लखनऊ फ्रेंचायझीसाठी खेळताना दिसतील. दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेल्या राहुलकडे लखनऊ संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपिवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लखनऊने राहुलला 15 कोटी रुपये, तर स्टॉइनिस 11 कोटी रुपये आणि बिश्नोईला चार कोटी रुपये देत संघासाठी निवड केली आहे. तर अहमबाद फ्रँचायझीनं हार्दिक पांड्या (15 कोटी), राशीद खान (15 कोटी) आणि शुभमन गिल (7 कोटी) यांना सात कोटी मोजत आपल्या संघासाठी निवड केली आहे. राहुलने 2013 मध्ये आयपीएल करिअरला सुरुवात केली. त्याचा पहिला संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर होता. राहुल 2014 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा भाग बनला आणि 2016 मध्ये त्याचा बंगलोर सोबत करार झाला. 2018 च्या लिलावात किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला 11 कोटी रुपयांना विकत घेतले. लोकेश राहुल ( KL Rahul) हा लखनऊ फ्रँचायझीच्या पहिल्या पसंतीचा खेळाडू होता. या संघासाठी गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे नाव चर्चेत होते. अखेन या नव्या संघाने त्याला करारबद्ध केले. 2018 पासून राहुलची आयपीएलमधील कामगिरी दमदार झालेली आहे. मागील दोन पर्वात तो पंजाब किंग्सकडून खेळला. त्याने 55 सामन्यांत 56.62 च्या सरासरीनं 2548 धावा केल्या आहेत. त्यात 25 अर्धशतकं व दोन शतकांचा समावेश आहे. त्यानं 2018 ते 2021 या तीन पर्वात अनुक्रमे 659, 593 आणि 626 धावा केल्या आहेत. मार्कस स्टॉयनिसची आयपीएलमध्ये 2015 दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून पदार्पण केले. 2020 मध्ये दिल्लीनं 4.8 कोटी मध्ये मार्कसला पुन्हा संघात घेतले. त्याने कॅपिटल्ससाठी 27 सामन्यांत 441 धावा केल्या आहेत आणि 15 विकेट्सही घेतल्या. या मध्यंतरी तो पंजाब किंग्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडूनही खेळला. त्याची ही आयपीएलमधील चौथी फ्रँचायझी आहे. रवी बिश्नोईनं 2020 चा 19 वर्षांखालील वर्ल्ड कप गाजवला असून. त्याने त्या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. पंजाब किंग्सने त्याला 2 को कोटी देत संघासाठी निवड केली होती. त्याने पहिल्या पर्वात 14 सामन्यांत 12 विकेट्स घेतल्या आणि त्यानंतर 2021 मध्ये 9 सामन्यांत 12 विकेट्स घेतल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या