कोलकाता, 19 डिसेंबर : आयपीएलच्या लिलावात एकही सामना न खेळलेल्या खेळाडूंवर सर्वाधिक बोली लावण्यात आली. यात वरूण चक्रवर्तीला कोलकाता संघानं तब्बल 4 कोटींना विकत घेतले. त्याचबरोबर राजस्थानचा लोकल बॉय आकाश सिंहला 20 लाख रुपयांची बोली लागली. आकाशनं आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय किंवा आयपीएल सामना खेळलेला नाही. त्यामुळं अनकॅप्ड खेळाडूसाठी ही लागलेली जास्त बोली आहे. राजस्थान रॉयल्सनं आकाश सिंहला 20 लाखांना आपल्या संघात घेतले. मुळचा भारतपूरचा असलेला डावखुरा मध्यम वेगवान गोलंदाज आकाश सिंह क्रिकेट खेळण्यासाठी जयपूरकडे वळला. अरावली क्रिकेट अकादमीमध्ये विवेक यादव यांच्या देखरेखीखाली आकाशनं क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. जवळपास 5 वर्षे या अकादमीमध्ये आकाश क्रिकेट खेळत होता. 2017मध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेत त्यानं एका सामन्यात एकही धाव न देता 10 विकेट घेतल्या होत्या. यानंतर राजस्थानची अंडर -16, अंडर -19, अंडर -23 आणि ज्येष्ठ संघात निवड झाली. प्रत्येक प्रकारात सातत्याने चमकदार कामगिरी करून तो दररोज नवनवीन यश मिळवत गेला. गेल्या वर्षी अंडर -23 मध्ये सलग चार सामन्यात त्यानं चांगली कामगिरी केली. वाचा- IPL 2020: लिलावात कोट्यावधींची बोली, एका क्लिकवर पाहा कोणत्या खेळाडूंना लागली लॉ टरी
वाचा- एकेकाळी पाणीपुरी विकणाऱ्या ‘या’ मुंबईकर खेळाडूवर लागली 2.40 कोटींची बोली दहावीत झाला होता चारवेळा नापास क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी करणारे खेळाडू क्वचितच अभ्यासात चांगेल असतात. अशाच आकाश सिंहला आयपीएलनं मालामाल केले असले तरी त्याला अभ्यास करायला अजिबात आवडत नाही. त्यामुळंच स्थानिक क्रिकेटमध्ये दर्जेदार कामगिरी करणारा आकाश सिंह सलग चारवेळा दहावीच्या परिक्षेत नापास झाला. मात्र त्यानंतर त्यानं एकही धाव न देता 10 विकेट घेतल्यामुळं घरच्यांनी त्याला माफ केले होते. आता हाच आकाश सिंह आयपीएलमध्ये दिग्गजांबरोबर खेळण्यास सज्ज आहे. वाचा- ‘विराट’वर लागली 1.90 कोटींची बोली, या संघाकडून खेळणार IPL या युवा खेळाडूंवर लागली बोली भारताचा अंडर-19 कर्णधार प्रियम गर्गला हैदराबाद संघानं 1.90 कोटींना विकत घेतले. तर, विजय हजारे करंडकमध्ये द्विशतकी खेळी करणाऱ्या यशस्वी जयस्वालवर राजस्थान संघानं 2.40 कोटींची बोली लावली. तर, प्रथम श्रेणी क्रिकेट गाजवणाऱ्या विराट सिंहवर हैदराबादनं 1.90 कोटींची बोली लावली. आयपीएलच्या लिलावात विराट सिंह या युवा खेळाडूचे नाव सर्वात आघाडीवर होते. 20 लाख बेस प्राईज असलेल्या विराटवर 1.90 कोटींची बोली लागली. विराटला संघात घेण्यासाठी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि हैदराबाद यांच्यात चुरस रंगली होती. मात्र अखेर हैदराबादनं विराट सिंहला आपल्या संघात घेतले.