सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का, 'हा' ऑलराऊंडर स्पर्धेतून 'आऊट'
मुंबई : यंदाच्या आयपीएलसाठी काही खेळाडू आधीच बाहेर झाले आहेत तर काही खेळाडूंना दुखापतीमुळे अर्धवट मैदान सोडावं लागत आहे. सनरायझर्स हैदराबादच्या स्टार खेळाडूबाबतही असचं घडलं आहे. सनरायझर्स हैदराबादसाठी हुकमी एक्का मानला जाणाऱ्या खेळाडूला अर्धवट आयपीएल सोडून जावं लागत आहे. दुखापतीमुळे त्याला ब्रेक घ्यावा लागत आहे. हैदराबाद टीमने स्वत: द्विट करून याची माहिती दिली. इंडियन प्रीमियर लीगचा पहिला हंगाम संपला आहे. सर्व संघांनी 7-7 सामने खेळले आहेत. त्याचवेळी दुसऱ्या सत्राला सुरुवात होत असताना सनरायझर्स हैदराबाद कॅम्पमधून एक वाईट बातमी आहे. अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर आयपीएलमधून बाहेर पडला आहे. सनरायझर्स हैदराबादने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून माहिती दिली.
या बातमीमुळे चाहत्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. तर वॉशिंग्टन सुंदर लवकर बरा होऊन मैदानात परत यावा यासाठी चाहते मात्र प्रार्थना करत आहेत. टीमने दिलेल्या माहितीनुसार सुंदरला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने त्रस्त झाला. त्यामुळे तो आयपीएलचे पुढचे सामने खेळू शकणार नाही.
IPL 2023 : विराटची एकाकी झुंज, घरच्या मैदानात पुन्हा RCB चे लोटांगणIPL 2023 मधून वॉशिंग्टन सुंदर बाहेर पडल्यामुळे सनरायझर्स हैदराबादला मोठा फटका बसला आहे. सुंदर मॅच विनर खेळाडू होता. बॉलिंग आणि बॅटिंगचं उत्तम कौशल्य त्याच्याकडे आहे त्यामुळे टीमला सावरण्यात त्याची मोठी कामगिरी होती.
IPL सुरू असतानाच जोफ्रा आर्चर करून आला सर्जरी, धक्कादायक माहिती आली समोर
मागच्या सामन्यातच सुंदरने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शानदार बॉलिंग करताना तीन विकेट्स घेतल्या होत्या. सामना हातून गेला असला तरी त्याच्या खेळीवर मात्र चाहते फिदा होते. टीममध्ये आता सुंदरची जागा कोण घेणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.