JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : गौतम गंभीर सोबतच्या वादानंतर विराट अनुष्का पोहोचले देव दर्शनाला Video Viral

IPL 2023 : गौतम गंभीर सोबतच्या वादानंतर विराट अनुष्का पोहोचले देव दर्शनाला Video Viral

मॅचनंतर गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांच्याशी भांडण केल्यानंतर, आता विराट पत्नी अनुष्का शर्मा सोबत देव दर्शनाला गेल्याचा व्हिडिओ समोर येत आहे.

जाहिरात

गौतम गंभीर सोबतच्या वादानंतर विराट अनुष्का पोहोचले देव दर्शनाला Video Viral

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 मे : काही दिवसांपूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात झालेल्या सामन्यानंतर विराट कोहली आणि लखनऊ टीमचा मेंटॉर गौतम गंभीर यांच्यात वादाची ठिणगी पडली. विराट आणि लखनऊचा गोलंदाज नवीन यांच्यात मैदानावर झालेल्या वादात गौतम गंभीरने उडी घेतली होती. सध्या सर्वत्र या राड्याची चर्चा सुरु असताना विराट पत्नी अनुष्का शर्मा सोबत देव दर्शनाला गेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. उत्तरप्रदेश येथील एकना स्टेडियमवर आयपीएल 2023 मधील 43 व्या सामन्यात आरसीबीने लखनऊवर 18 धावांनी विजय मिळवला. लखनऊच्या होम ग्राउंडवर पारपडलेल्या सामन्यानंतर आरसीबीच्या विराट कोहली लखनऊच्या नवीन उल हक आणि गौतम गंभीर यांच्यात कडाक्याच भांडण झालं. विराट आणि  नवीन यांच्यात झालेल्या वादात गौतम गंभीरने देखील उडी घेतल्याने याला अजून वेगळा रंग चढला होता. इतर खेळाडूंनी केलेल्या मद्यस्थीनंतर हा वाद मिटला परंतु सोशल मीडियावर भांडणात सहभागी झालेल्या खेळाडूंना मोठ्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांच्यातील सामन्यांनंतर विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मा सह एका मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. विराट अनुष्काच्या या देव दर्शनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात विराट कोहली धोतर आणि सोवळ्यात कपाळावर भस्म लावलेला पाहायला मिळत असून अनुष्का शर्मा ही साडीत दिसत आहे.

संबंधित बातम्या

कोणी देव तर कोणी गुरु, भारतीय क्रिकेटर्स यांच्या पुढे होतात नतमस्तक विराट -अनुष्काचे देव दर्शन : विराट कोहलीने पत्नी अनुष्का सोबत काही महिन्यांपूर्वीच आध्यात्मिक यात्रा केली होती.  यात त्याने ऋषिकेश येथील स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आश्रमाला भेट देऊन तेथील धार्मिक कार्यात सहभाग घेतला होता. ऋषिकेश यात्रेपूर्वी विराट कोहलीने पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिका सोबत वृंदावन येथील आश्रमाला  देखील भेट दिली होती. तसेच मार्च महिन्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरु असताना विराटने अनुष्कासह उजैन येथील महाकालेश्वर मंदिरात जाऊन देखील पूजा विधी केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या