JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 SRH vs KKR : केकेआरचा दणदणीत विजय, हैदराबादला होमग्राउंडवर पराभवाचा धक्का

IPL 2023 SRH vs KKR : केकेआरचा दणदणीत विजय, हैदराबादला होमग्राउंडवर पराभवाचा धक्का

आयपीएल 2023 मध्ये 47 वा सामना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पारपडला. या सामन्यात केकेआरने हैदराबाद संघाचा पराभव केला आहे.

जाहिरात

केकेआरचा दणदणीत विजय, हैदराबादला होमग्राउंडवर पराभवाचा धक्का

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 मे : आयपीएल 2023 मध्ये 47 वा सामना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पारपडला. या सामन्यात केकेआरने हैदराबाद संघाचा पराभव केला आहे. कोलकाता नाइट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादवर 5 धावांनी विजय मिळवला असून आयपीएलमधील चौथा सामना जिंकला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर हा कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद  यांच्यात सामना खेळवण्यात आला.  या सामन्यात सुरुवातीला टॉस जिंकून केकेआरच्या कर्णधाराने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु केकेआरच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही. केकेआरने पहिल्या पाच ओव्हरमध्येच 3 महत्वाच्या विकेट गमावल्या. केकेआरकडून जेसन रॉयने 20, नितीश राणाने 42, रिंकू सिंहने 46, अँड्री रुसेलने 24 तर अनुकूल रॉयने 13 धावा केल्या. हैदराबादच्या गोलंदाजांना केकेआरच्या 9 विकेट्स घेण्यात यश आले. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 171 धावा केल्या.

सनरायजर्स हैदराबादकडून विजयाचे आव्हान पूर्ण करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि मयांक अग्रवाल फलंदाजीसाठी मैदानात उतरले. हैदराबादकडून मयांक अग्रवालने 18, राहुल त्रिपाठीने 20, एडन मार्करमने 41, हेनरीचने क्लासेनने 36 तर अब्दुल समदने 21 धावा केल्या. परंतु अखेर विजयाचे आव्हान पूर्ण करता न आल्याने हैदराबादचा होम ग्राउंडवर पराभव झाला. केकेआरकडून शार्दूल ठाकूर आणि वैभव अरोराने प्रत्येकी 2  तर हर्षित राणा, अनुकूल रॉय, वरूण चक्रवर्ती आणि आंद्रे रुसेलने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या