IPL ने या खेळाडूंना रातोरात केलं करोडपती

केएल राहुल याला प्रथम RCB ने 10 लाख रुपयांच्या मूळ किंमतीत खरेदी केले होते. त्यानंतर टी २० मध्ये केलेल्या शानदार कामगिरीनंतर लखनऊ सुपर जाएंट्सने त्याला कर्णधार बनवून यावर्षी त्याला आयपीएलसाठी 17 कोटी मिळाले आहेत.

रवींद्र जडेजा याला 2008 मध्ये राजस्थान संघाने त्याला अवघ्या 10 लाखात खरेदी केले. मात्र आता आयपीएल 2023 साठी त्याच्याकरता चेन्नईने 16 कोटी रुपये मोजले आहेत.

युवा खेळाडू इशान किशनला 2016 मध्ये गुजरात लायन्सने त्याला 35 लाख रुपयांना खरेदी केले होते. मात्र त्याला आयपीएल 2023 खेळण्यासाठी मुंबई इंडियन्सकडून 15.2 कोटी रुपये मिळतात.

हार्दिक पांड्याला 2015 मध्ये आयपीएलसाठी फक्त 10 लाख रुपये मिळाले होते.  परंतु आता त्याची किंमत गगनाला भिडली असून यंदा गुजरात टायटन्सने त्याला 15 कोटी रुपये दिले आहेत.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने IPLमधील आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. सॅमसनला 2012 मध्ये आयपीएलसाठी 8 लाख रुपये मिळाले होते. आता त्याची किंमत 14 कोटी रुपये आहे.

सूर्यकुमार यादव याला पहिल्या आयपीएल सीझनसाठी 10 लाख रुपये मिळाले होते. परंतु आता मुंबई इंडियन्समध्ये त्याची फी 8 कोटी रुपये इतकी आहे.