रोहित शर्मा आऊट नव्हता? MI vs KKR सामन्यात अंपायरकडून झाली मोठी चूक, Video
मुंबई, 1 मे : आयपीएल 2023 मध्ये रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात रोमांचक सामना पारपडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने हा सामना जिंकून 6 विकेट्सने जिंकून कर्णधार रोहित शर्माला वाढदिवसाचे गिफ्ट दिले. या सामन्यात मुंबईचा विजय झाला असला तरी रोहितला बाद करण्याचा निर्णय देताना अंपायरकडून मोठी चूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलमधील 1000 वा सामना पारपडला. हा सामना सर्वार्थाने खास ठरला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानचा युवा क्रिकेटर यशस्वी जयस्वालने आयपीएल 2023 मधील तिसरे शतक ठोकले. तर मागील सलग 2 सामने हरलेला मुंबई इंडियन्सने विजयासाठी मिळालेलं 212 धावांच आव्हान 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. परंतु या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला बाद करण्याचा निर्णय देताना अंपायरकडून मोठी चूक झाल्याचे उघडकीस आले आहे. सध्या रोहित शर्माच्या विकेटचा व्हिडिओ व्हायरल होत असून नेटकरी यावर प्रश्न उपस्थित करीत आहेत.
झाले असे की, मुंबई इंडियन्सला विजयासाठी 212 धावांच आव्हान मिळालं असताना सलामी फलंदाज म्हणून रोहित शर्मा आणि ईशान किशन हे दोघे मैदानात आले, परंतु संदीप शर्माने दुसऱ्या ओव्हरमध्ये टाकलेल्या शेवटच्या बॉलवर रोहितचा त्रिफळा उडाला. अंपायरने देखील त्याला बाद झाल्याचा निर्णय दिला. परंतु संदीप शर्माने टाकलेला बॉल हा स्टंपचाय संपर्कातही आला नव्हता अन् बेल्स विकेटकिपर संजू सॅमसनच्या ग्लोव्ह्जने पडल्य़ा होत्या असे एका व्हिडिओ मध्ये दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे, रोहित शर्माच्या विकेट विषयी सोशल मीडियावर वाद सुरु आहे. मुंबई इंडियन्स आणि रोहितचे फॅन्स यात अंपायरची चुकी असून रोहित बाद नव्हताच असे म्हणत आहेत, तर राजस्थान रॉयल्सचे चाहते अंपायरचा निर्णय बरोबर असल्याचे म्हणतं आहे.